पान:गुन्हेगार जाती.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जदुये ब्राह्मण. १७५ याचें आहे ? तेव्हां हे त्याला सांगतात कीं, त्यानें आमच्या पितळेच्या आणि रुप्याच्या दागिन्यांचें सोनें केलें म्हणून दर्शन घ्यावयाचें आहे. अर्थात् तो भाबडा मनुष्यही त्या सोद्यांच्या बरोबर त्या ब्राह्मणाच्या शोधार्थ निघतो, आणि “ बावाजी " व त्यांचे साथीदार यांचे नम- स्कार चमत्कार आणि संवाद पाहून थक्क होतो, व फांसांत पडतो. नंतर 6 माझ्या रुप्याच्या दागिन्यांचें सोने करून या ' असा तो आग्रह धरतो. तो ब्राह्मण नाहीं नाहीं असें म्हणून अखेर त्या इसमाबरोबर जाऊन त्याच्या घराच्या मागच्या बाजूच्या अंधेच्या खोलींत बिन्हाड देतो. त्याचा भाव वाढावा म्हणून ते खालीं लिहिल्याप्रमाणें युक्त्या करतात. बाबाजी मंत्रसामर्थ्यानें अदृश्य होतात; ह्याची प्रतीति पाहण्यासाठी त्या भावार्थ्याला सांगतात कीं, कपाळावर एक रुपया ठेवून उन्हांत जाऊन सूर्याकडे पांच मिनिटें पहा. असें पाहिल्यावर परत अंधार - कोठडीत आल्यावर अर्थात् त्याला कांहीं दिसत नाहीं. आणि हा काय चमत्कार आहे, असें त्याला वाटतें. थोड्या वेळानें दिसूं लागल्यावर बावाजीही दिसू लागतात. भगवतीचें दर्शन करवितों, असें सांगून एखाद्या रात्रीं त्याला गांवाबाहेर एखाद्या बगीच्यांत घेऊन जातात, आणि एकजण तेथें भगवती बनून त्या भाबड्याला रेलचेल आशीर्वाद देतो. रुप्याच्या दागिन्यांचें गांठोडे करून तें खोलींतील जमिनींतपुर- ल्याचें भासवितात. नंतर बावाजी तेल, तूप, ऊद आणावयास सांगून त्या जागेवर भट्टी पेटवितात, आणि बावाजी परत येईपर्यंत त्या भट्टीवर नजर ठेव, असें त्या भाबड्याला सांगतात. पुढें तो ब्राह्मण आणि त्याचे चेले आपल्या अंगावर दागिने लपवून चालते होतात. वाट पाहून पाहून थकला म्हणजे तो इसम भट्टीखालीं उकरतो, आणि आंत पाहतो, तों फडक्यांत नुसती दगड-माती निघते. वरीलप्रमाणेंच दुप्पट वजन करण्याच्या मिषानें सोन्याचे दागिने मिळवून त्यांसह हे लोक पसार होतात.