पान:गुन्हेगार जाती.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ गुन्हेगार जाती. खोटी नाणीं कशी ओळखावीत ? ) ज्या नाण्याचा संशय असेल त्याचा त्याच प्रकारच्या दोन खऱ्या नाण्यांशी पडताळा पहावा. ( २ ) खोटें नाणं दगडावर चांगला नाद धरीत नाहीं. ( ३ ) त्याचा रंग पितळी किंवा शिशाप्रमाणें मलीन असतो. पण कांहींना विशेष जिल्हई असत. ( ४ ) त्याची कड एक- सारखी जाड नसते, व त्याला थोडासा बांक असतो. (५) १९०५ नंतरच्या सर्व खऱ्या नाण्यांच्या कडांना १५० सरळ दांते असतात. खोट्या नाण्यांचे दांते जरासे तिरपे असून ते धड व एकसारखे नसतात, आणि त्यांतील अंतर कमजास्त असतें. कडा तपासण्यासाठीं खोटें नाणें दोन खऱ्या नाण्यांमध्यें धरावें. ( ६ ) खोट्या नाण्यांच्या आंतील कडांवरचे रखे ओबडधोबड असून ते एकसारखे व सारख्या अंतरावर नसतात. (७) अपुरा छाप अगर पुसलेल्या किंवा दुहेरी रेघा दिस- ल्या म्हणजे नाणें संशयास्पद आहे असें समजावें. ( ८ ) कांहीं खोट्या नाण्यांवरची अक्षरें खऱ्यापेक्षां पातळ असतात. (९ छापाव्यति- रिक्त जागा मऊ एकसारखी नसली किंवा तिच्यावर डाग दिसले तर नाणें संशयास्पद समजावें. (१०) कडा हाताला मऊ लागल्या नाहींत, तर नाणें संशयास्पद समजावें. ( ११ ) सर्व ओतींव नाणीं खोटीं सम- जावींत. त्यांचा पृष्ठभाग दाणेदार किंवा टांचणीचे अग्राइतक्या बारीक छिद्रांनीं व्यापलेला असतो, तीं काळी दिसतात, पण सुई - टांचणीनें तीं तेव्हांच समजून येतात. सांच्यांत रस ओततात तेथील कड साफ नसते, आणि अक्षरें व आकृति चतुष्कोनी व ठळक कडांच्या नसून वाटोळ्याशा असतात. ( १२ ) वरीलपैकीं निदान दोन दोष तरी खोट्या नाण्यांत असतात. म्हणून एकच दोष असलेले नाणे एकाएकीं खोटें म्हणू नये.