पान:गुन्हेगार जाती.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ गुन्हेगार जाती. पोलिसाशी ठराव करतो. मग याप्रमाणें बळी दिलेले इसम गुन्हे कबूल करून शिक्षा भोगतात. गुन्हा करतांना एखादा हबुरा ठार झाला तर · त्याचे सांथीदार त्याच्या बायकोला १५० रुपये देतात, आणि एखा- याला पकडलें, तर त्याची सुटका होईपर्यंत त्याच्या बायकापोरांला पोसतात. ते दागिने घालीत नाहींत, व त्यांच्या अंगावर वस्त्रही अ . झांकण्यापुरतें असतें. चोरीचें जवाहीर, कपडे, भांडी ते आपल्या तळा- नजीक पुरतात. रुपयांत चार आणे बट्टा देऊन एखाद्या जमीनदारामार्फत ते चोरीचा माल विकतात. जदुये ब्राह्मण. हे लोक एखाद्या गांवीं जाऊन डाळतांदुळाचें दुकान घालतात. नंतर - एकजण महंताच्या वेषानें तेथें येतो. जमीनदाराच्या वेषानें दुसरा येऊन सांगतो कीं, मी लांचून आलों आहें. नंतर महंताला पाहून आनंद झाल्यासारखें तो दाखवितो, व त्याच्या भजनीं लागून लोकांत खूप छत भरतो की महंताची करामत, जादू फार मोठी आहे; त्यानें मला लुगडीं, पैसे, जनावरें वगैरे पुष्कळ दिलीं. तो महंताला आपल्या घरी येण्याबद्दल • पुष्कळ आग्रह करतो, आणि अशा रीतीनें लोकांचा त्याचेवर भाव बसून .त्यांच्या ठकबाजीला सुरुवात होते. भोंदण्याजोगा मनुष्य अमक्या गांवांत आहे, अशी माहिती मिळवून एकजण साधूच्या वेषानें त्या गांवीं येतो " • त्याजबरोबर दुसरा एकजण चेला म्हणून येतो. साधु समाधि लावण्याचें ढोंग करतो. येथें कोणी पवित्र ब्राह्मण आला आहे कीं काय असें विचारीत टोळीतील इतर इसम तेथें येतात, आणि ज्याला भोंदावयाचें असतें, त्याच्या घरीं जातात. तो विचारतो कीं, त्या ब्राह्मणाशीं तुम्हांला काय कराव-