पान:गुन्हेगार जाती.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ओरिसामधील पानलोक. हे कनिष्ठ जातीचे हिंदू लोक, ढेनकनल व गुर्जतमध्ये राहतात. ते जातीनें विणकर असून कांहींजण शेतीपोती व चौकीदारी करतात. ते सुदृढ, लुच्चे आणि धीट असतात. यामुळे जमिनीच्या तंट्यांत जमीन- दार लोक दांडगाईसाठीं त्यांना नौकरीस ठेवितात. तसेंच गाडीवान लोक रात्रीं पहाऱ्यासाठीं त्यांना बरोबर नेतात. ते ढोरें चोरणें व मारणें, आणि उचलेगिरी वगैरे गुन्हे करितात. पण अलीकडे टोळ्या करून दरोडे घालणें, खून करणें, वगैरे गुन्हे ते करूं लागले आहेत. सन १९०२ साली नट नाईक व नंतर कुसन डिगल यांच्या टोळ्यांनी बराच पुंढावा माजविला होता. हबुरे. ही जात गंगायमुनेच्या मध्यदुआबामध्ये आढळते. ते फिरस्ते असून चोरटे आहेत. दुसऱ्या जातींनीं वाळीत टाकलेल्या बायका आपल्या जातींत ते घेतात. इटा जिल्ह्यांतल्या जेलसर परगण्यांतील नोखेरा गांवीं त्यांच्या जमाती होतात. ते लहानपणीच मुलांना शेतांतल्या चोऱ्या करण्यास शिकवितात, आणि मोठे झाल्यावर घरफोडी वगैरे गुन्हे ते करतात. शेतचोरीला त्यांची टोळी निघते तेव्हां तिच्यांत सुमारें वीस असामी असतात, आणि घरफोडीच्या टोळींत सुमारें आठ नऊ असामी असतात. गुन्ह्याच्या वेळीं त्यांच्याजवळ सोडगीं असतात. त्यांचा गुन्हा पकडला तर टोळीचा नाईक दोन तीन इसमांस स्वाधीन करण्याचा