पान:गुन्हेगार जाती.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ गुन्हेगार जाती. साडेसात हजार रुपयांच्या भर हिंडतात. त्यांची रहाणी गलिच्छ असते. ते जुवेबाज आणि दारू- बाज आहेत. एका वर्षाच्या फेरींत त्यांनीं मनीआर्डरी घरी पाठविल्या असा दाखला आहे. ते आपणांला फकीर, पंडित किंवा नशीब सांगणारे म्हणवितात, आणि गांवोगांव लोकांच्या ( युरोपियनांच्यासुद्धां ) गांठी घेतात. त्यांच्याजवळ एक दुहेरी कागद असतो, त्यावर तुरटीनें गाईचें किंवा चेटकीचें चित्र काढतात. तो कागद पाण्यांत बुचकळून चेटकीचें चित्र दिसलें तर प्रश्न विचारणाराला ते असें सांगतात कीं, ही चेटकी तुझा जीव घेईल; तेव्हां मंत्रांचें कांहीं साधन केलें पाहिजे. गाईंचें चित्र दिसलें तर त्याला असें सांगतात कीं, तूं केव्हां तरी गाईंचा छळ केला, ती शाप देत आहे; परंतु मंत्रसाधनानें तिचें दर्शन झालें आहे, तेव्हां आतां कांहीं सोन्या-रुप्याचे अगर कापडाचें दान कर. ते कधीं कधीं फार्क- राच्या वेषानें बारीक लोखंडी चिमटा घेऊन एखाद्या गृहस्थाच्या घरीं जातात त्याच्या नोकराकडून त्याच्यासंबंधानें माहिती मिळवितात, नंतर त्याला भेटतात; आणि पाण्यांत कांहीं मीठ व दुसरे पदार्थ घालून त्यांत तो चिमटा बुडवितात. त्या चिमट्यांतून ठिणग्या निघू लागतात आणि चिमटे वेगळाले होतात. मग पूर्वी मिळविलेल्या माहितीप्रमाणें त्याचें नशीब सांगतात, आणि हळूच गोष्ट काढतात कीं, 'मुलीचें लग्न करावयाचें आहे अगर पोरक्या मुलांचा अनाथाश्रम आहे, आमचें एखादें देऊळ आहे, किंवा आम्ही अमुक अमुक महंताचे चेले आहोंत, वगैरे बहाणा करून ते पैसे उकळतात. कांहीं लोक तेलाच्या प्याल्यांत पाहून आम्हांला नशीब सांगतां येतें, असें भासवितात. कांहीं वैदिक औषधे विकतात, आणि भाबड्या लोकांकडून स्टांप कागदावर करार करून घेतात कीं, गुण आल्यावर सुमारें पन्नास रुपये देईन. ग्रहणपर्व - णीच्या सुमाराला या लोकांना चांगलें गिन्हाईक मिळतें. हे लोक बाय- कांना लागणारे किरकोळ जिन्नसही विकतात. यांच्या मुख्यास चौधरी ह्मणतात.