पान:गुन्हेगार जाती.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नौसारिये. १७१ गांठोडें आपल्या साथीदारांना देतात, व कधीं कधीं तें खिडकीबाटें बाहेर टाकतात, आणि तारेच्या खांबाचा नंबर लक्षांत ठेवून तें घेऊन जातात. बायकांचा पोषाख करून एखाद्या निजलेल्या बाईचें बोचकें किंवा दागिने ते लांबवितात. | नालबंदाच्या तळाला बंद ह्मणतात, तेथें चोरीचा माल येऊन थड- कतो. टोळीपैकीं कोणाला पकडलें तर त्याच्या सुटकेसाठीं तो पैसे पाठ- वितो, आणि त्याला कैद झाली तर, तो सुटेपर्यंत त्याच्या बायकापोरांना पोसतो. चंद्रवेदी पावसाळ्याच्या सुमाराला घरी परततात. ते मुंबई, पुणे, काठेवाड, भावनगर, अजमीर, जोधपूर, पंजाब, मध्य हिंदुस्थानांतील संस्थानें, वगैरे ठिकाणी जातात. ते हत्यारें घेऊन मोठाले गुन्हे करीत नाहींत, आणि रात्रीं चोऱ्या करीत नाहींत. नौसारिये. हे पत्त्यांनीं जुगार खेळतात. टोळींतील एकजण थाटाचा पोषाख करून नबाब बनतो. तो फार पैसेकरी आहे, आणि जुगारीचा त्याला फार नाद आहे, वगैरे अफवा ते पसरतात. त्यामुळें पुष्कळ लोक जुगार खेळावयाला येतात आणि फसतात. हे लोक संयुक्तप्रांतांतील राहणारे आहेत. भत्रे किंवा माध्व. ह्यांची मुख्य वस्ति पंजाबांत सियालकोट येथें आहे. ते बंगाल, मुंबई, वऱ्हाड, निजामशाही, ग्वाल्हेर, सिंध, तेलंगण, वगैरे सर्व हिंदुस्थान-