पान:गुन्हेगार जाती.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० गुन्हेगार जाती. गुंतलें म्हणजे उपरदार इशारत करतो, आणि छावा त्याचें गांठोडें घेऊन निसटतो. रस्त्यांत एखाद्या उच्च जातीच्या श्रीमंत मनुष्याच्या कपड्याला छावा काठीनें घाणीचे डाग पाडतो. उपरदार येऊन त्या गृहस्थाला म्ह- णतो कीं, तुम्ही बसला होता तेथें कपडे मैले झाले, त्यांचे डाग धुतले पाहिजेत. बापडा विहिरीवर किंवा नदीवर कपड्याचे डाग काढण्याला जातो. उपरदारही त्याचेबरोबर तोंड धुण्याला म्हणून जातो. आणि कांठावर त्यानें थैली ( बसनी ) किंवा गांठोडें ठेविलें असेल तें घेऊन छावा पोबारा करतो. एखादे वेळीं उपरदार एखाद्या गृहस्थाशीं बोलूं लागतो. दुसरा येऊन त्याला सेंटून जातो, आणि म्हणतो कीं, मी भंगी आहें, शिवल्याबद्दल माफ करा. त्यासरसें उपरदार आणि तो गृहस्थ आंघोळीला जातात, व छावा गांठोडें किंवा थैली लांबविण्याचें काम करतो. तिघे चौघे चंद्रवेदी आंघोळीच्या घांटावर जातात, व स्नान कर- णारांना बोलण्यांत वगैरे गुंतवितात. इतक्यांत उपरदाराच्या इशारती- प्रमाणें छावा त्यांच्या जिनसा घेऊन पळून जातो. एखादी स्त्री गांठोडें पुढे ठेवून बसते व उपरदार तिच्यासमोर शौचाला बसतो. तिनें तोंड फिरविलें कीं छावा तिचें गांठोडें घेऊन जातो. चंद्रवेदी श्रीमंताच्या घरी नौकरीस राहून आपल्या इमानाची साक पाडतात. कालांतरानें जड- जवाहिराची माहिती झाली म्हणजे ते तें पसार करतात. बाहेरगांवीं गेलेल्या लोकांच्या घराचे आपण मालक आहोंत असें भासवून, त्याचें कुलूप उघडून त्यांत ते दोन तीन दिवस राहतात; आणि शेवटीं असेल नसेल तें घेऊन चालते होतात. एखादें मोठें लग्न वाट चालत असतांना एक दोघे चंद्रवेदी त्याबरोबर निघतात, आणि त्यांतील एखाद्या भाबड्या श्रीमंत मनुष्याची ओळख पाडतात. पुढे एखाद्या मुक्कामाला त्याला चांगली गाढ झोप लागली आहे, अशी वेळ पाहून त्याची दागिन्यांची थैली वगैरे घेऊन तडाख्यानें लांबवर निघून जातात. आगगाडीच्या प्रवाशाचें गांठोडे उचलून त्याच्या जागीं ते आपलें ठेवितात, निजलेल्या उतारूंचें