पान:गुन्हेगार जाती.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेरड. संज्ञा :- ह्यांना बेडर, ब्याडेरू, तलवारू, नाइक्रमकळरू, काटक ( खाटिक, गळेकापू ) ह्मणतात. - वस्तिः - ह्यांची वस्ति बेळगांव, धारवाड, विजापूर व त्यांनजीकची संस्थानें आणि मद्रास इलाख्यांतील कांहीं भाग येथें आहे. गुन्ह्यांचें क्षेत्रः- कर्नाटकांत आपले गांवापासून सुमारें चाळीस ते पन्नास मैल ते गुन्हे करतात. ही जात फिरस्ती नसून, ती खेड्यांत घरें- दारें करून राहिली आहे. लोकसंख्याः- ह्यांची लोकसंख्या सुमारें पावणेदोन लाख आहे. स्वरूप :- ह्यांचें खाणें व रहाणें गलिच्छ असतें. ते रामोशाप्रमाणें दिसतात. ते काळे, खाशा पीळदार व मजबूत बांध्याचे, सोशीक व जलद चालणारे असून त्यांचे डोळे व कान तिखट असतात. खडकाळ प्रदेशांत अंधाऱ्या रात्रीं तीस मैल ह्मणजे बेरडास कांहींच नाहीं. कुत्रे व भाले घेऊन रानडुकराची शिकार पायदळ करण्याचा त्यांना फार नाद असतो. ते जुव्वेबाज व दारूबाज असतात. पुरुषांचा पोषाख जाडेंभरडें पागोटें, पेहरण किंवा कुडतें, चोळणा, धोतर, किंवा लंगोटी हा होय. त्यांच्या हातांत आंगठ्या व कानांत बाळ्या असतात. त्यांच्या बायका पुरुषाप्रमाणें राकट असून चोळी लुगडें नेसतात, पण कासोटा घालीत नाहींत. त्या अंगावर कानडी पद्धतीची लेणीं घालतात. सन १८९५ सालीं बेरडांनी बेळगांव जिल्ह्यांत बंडावा माजविला होता. जरा गड- बड झाली कीं ते बिघडतात आणि पोलिसला न जुमानतां आसमंतात् उपद्रव देतात. त्यांचेवर नेहमीं पोलीसची नजर पाहिजे.