Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चंद्रवेदी. १६९ तेनी :- उपरदारानें गालाला हात लाविला म्हणजे जवळ ये असें समजावें. तो जिकडे कोंपर करतो त्या बाजूची जिन्नस उचलावी, मूठ वर करून दुसऱ्या हातावर मारिली, म्हणजे पळ, तुजवर नजर आहे असें साथीदार पोरानें समजावें, त्यानें छातीवर हात ठेवून कोंपर वर केला म्हणजे निर्भय समजून जिन्नस घेऊन पळावें. जिन्नस उचलतांना त्या मुलाला पकडलें तर उपरदार कोंपर खाली करून खांद्यापर्यंत हात नेता; ह्याचा अर्थ असा कीं, जिन्नस टाक आणि पळ. हातावर हात ठेविला म्हणजे ती जिन्नस पुरावी. एक कोंपर वर करून दुसऱ्या हाताचा आंगठा कमरेवरून त्यानें फिरविला, म्हणजे कमरेचा कसा काढून घे, असें समजावें. दसऱ्यानंतर नालबंद दहा ते विसांची टोळी घेऊन ज्योतिषी सांगेल त्या दिशेला फेरीला निघतो. टोळींत निमे छोकरे व निमे बापे असतात. ज्योतिषी सांगेल त्याप्रमाणें कांहीं दहीं, भात आणि गूळ व कांहीं सुपारी खातात. फेरीला निघण्यापूर्वी टोळींतील लोकांच्या बायकापोरांची तरतूद नालबंद करतो. सर्वजण एखाद्या गांवाबाहेर जमतात. तेथून एक उपरदार आणि एक दोन छावे अशा पोटतुकड्या करून ज्या गांवीं जावयाचें असेल, त्याच्या अलीकडच्या स्टेशनचें तिकीट घेतात, आणि पूर्वसंकेतानुरूप डेरेवाल्यासह नालबंद उतरला असेल तेथें सुमारें पंधरा दिवसांनी येऊन मिळतात. गुन्हेः–बाजारांत गर्दी जमली म्हणजे एखाद्या दुकानाजवळ दोघेजण खूप जोरानें भांडतात. तेथें लोकांचा घोळका जमतो, त्यांत दुकानदार- ही येतो. मग उपरदाराच्या इशारतीप्रमाणें छावा जिच्यावर डोळा असेल ती जिन्नस घेऊन पसार होतो. तसेंच व्यापारी म्हणवून उपर- दार दुकानदाराशीं सौद्याबद्दल जिकीर घालतो, इतक्यांत छावा त्याची थैली लांबवितो. यात्रेमध्ये एखादे मिठाईचे दुकानीं ते जातात, आणि गिऱ्हाईक आपलें गांठोडें खालीं ठेवून पैसे देण्यांत किंवा माल घेण्यांत