पान:गुन्हेगार जाती.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ गुन्हेगार जाती. असतें. त्यांत एक दोरी ओवून तें बगलेला अशा रीतीनें लटकवितात कीं तें हाताखालीं झांकून जावें. त्यांच्या कोयत्याला दात्री ह्मणतात. भिंतीच्या तळाशीं किंवा माळवदाला सब्बळानें भोंक पाडून डोक्याकडून आंत शिरतात. आवाज होऊं नये म्हणून सब्बळानें मोकळा झालेला भिंतीचा भाग ते हातांत घेतात, आणि डोळ्यांत धूळ जाऊं नये म्हणून पागोट्याचा पदर डोळ्यांवरून घेतात. सव्वळाच्या टोकाला कापड गुंडा- ळून 'त्यानें कुलपे काढतात. कोणी जागे झाल्यासारखें दिसलें तर भोंका- बाहेर ते येऊन थांबतात, आणि तो पुन्हां निजला तर आंत शिरून आपलें काम चालू करतात. ह्या लोकांनी पाडलेलें भोंक फार लहान आणि नीटनेटकें असतें. हे लोक माग नाहींसा करण्यांत मोठे हुषार असतात. त्यासाठीं ते चवड्यावर चालतात, पायांस चिंध्या गुंडाळतात, व आल्या पावलांनी ज्या गांवीं गुन्हा केला असेल, त्या गांवीं परत चालत येतात. चोरीचा माल खेचरांवरून नणें झाल्यास, चौकीसारख्या ठिकाणीं ते चरावरील मालावर महारोगी बसवितात, म्हणजे कोणी झाडा घेण्याला जवळ येत नाहीं. ते रस्त्यावर एक कडें काढून त्यांतून एक रेघ ओढ - तात, म्हणजे जिकडे रेघेचें टोंक असेल त्या बाजूनें टोळी गेली, असें मागून येणाराला कळतें. खूण न दिसली तर तो एखाद्या टेंकडीवर जाऊन आगाऊ ठरल्याप्रमाणें एखाद्या पाख राचा किंवा जनावराचा आवाज काढतो, म्हणजे त्याचे साथीदार त्या- प्रमाणें हांक देतात. ते सांसीशिवाय इतर कोणत्याही जातीची गुन्ह्याचे कामी मदत घेत नाहींत, व तुपावांचून कधीं जेवीत नाहींत. बीर आणि मिरपूर येथील हरणी लोक मुंबई इलाख्यांत नाशिक, मुंबई, सुरत, वगैरे ठिकाणीं, व परभणी येथेंही जातात. मुंबई शहरांत ते गोदीवर जहाजें रंगविण्याचे किंवा एंजिनमध्यें कोळसे घालण्याचें काम पत्करतात. जगराव इलाख्यांतल्या पुष्कळ हरणी स्त्रिया आपल्या