पान:गुन्हेगार जाती.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हरणी. १६५ पारध्यांना पकडलें म्हणजे लांच देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. घर फोडतांना कधीं कधीं आरपार भिंत न फोडतां कानोसा घेण्यासाठी ते एक पापोद्रा ठेवितात. आरपार भोंक पाडल्यावर नाईक काडी ओढून आपल्यासमोर हाताचा पंजा धरतो म्हणजे त्याच्या- वर सावली पडून आंतील सर्व जिनसा त्याला दिसतात. चोरलेला माल घेऊन एक इसम टोळीच्यामागें चालतो, ह्मणजे टोळीला कोणी अडविलें कीं ह्याला मागचे मागें निसटावयास सांपडतें. पारधी लोक पोलीस ठाण्याच्या सरहद्दीवरच्या गांवांत राहतात, आणि सदरहु हद्दींत ते गुन्हे करीत नाहींत. हरणी. 66 हे लोक पंजाबाकडचे आहेत. तापा ” किंवा घरफोडी करतांना त्यांच्यांतला एक माणूस भिंतीपाशी हात वर धरून घट्ट उभा राहतो. दुसरा त्याच्या पाठीवरून चढून हातावर उभा राहून भिंतीच्या वरवंडी- वरून आंत उतरतो. याप्रमाणें जरूर तितके लोक आंत जातात. निज- लेल्या माणसांना भय घालण्यासाठीं कांहीं इसम त्यांच्यावर काठ्या घेऊन आडवे उभे राहतात. कधीं कधीं आसपासच्या घरांना कड्या लावून एक इसम चोरीच्या घरांत उतरतो, आणि कडी काढून आपल्या साथीदारांना आंत घेतो. दागिने सहज काढतां न आले तर ओरबडून किंवा हिसकाहिसकी करून ते ते काढून घेतात. घर फोडण्यापूर्वी एक इसम फकिराच्या वेषानें गांवांत येऊन ब मुलांच्या दागिन्यांवरून घर शोधून काढतो. त्यांच्या घरफोडीच्या हत्या- राला सब्बळ ह्मणतात; तें लोखंडी, गोल, टोंकाकडे निमुळतें, सुमारें दीड फूट लांब व एक इंच जाड असून त्याचे डोक्याला एक भोंक पाडलेलें