पान:गुन्हेगार जाती.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ गुन्हेगार जाती. त्यांच्या बायका पायांत रुप्याचे दागिने घालीत नाहींत, आणि भिंतीवर किंवा खुंटीवर लुगडें न ठेवितां तें सदोदित जमिनीवर ठेवितात. त्यांच्या स्त्रिया पुरुषांबरोबरच जेवावयाला बसतात, मागें राहत नाहींत. गांव सोडतांना हे लोक पाटलाजवळून दाखला घेतात. ते देवकार्य कर- तात तेव्हां एखादा हेला मारतात, आणि यथेच्छ दारू पितात. जातीचे तंटेबखेडे त्याच प्रसंगीं मिटवितात, व गुन्ह्याचे बेत ठरवितात. जातीसंबं- धाच्या गुन्ह्याचा दंड अमुक अमुक दारू असतो. पुरुषांचा गुन्हा अस- ल्यास पुरुष ती दारू पितात, बायकांचा असल्यास बायका पितात. पुरुष किंवा स्त्री शिंदळकींत सांपडली तर डावा कान वस्ताऱ्याने काप- तात. त्यांच्यांत खऱ्या खोट्याचा निवाडा येणेंप्रमाणे करतात:-( १ ) एक चक्र काढतात त्याला कुंड म्हणतात, त्याच्यांत एक पाण्याचें भांडे ठेवून त्यामध्यें एक रुपया आणि सुरी घालतात. आणि तोहमतदार मनुष्याला शपथ घेऊन त्यांतील रुपया व सुरी काढण्यास सांगतात. त्याचें मन पापामुळे कचरत असलें तर तो सुरीला हात लावीत नाहीं. (२) तोह- मतदार इसमाला सुरी घेऊन छाती किंवा मानेइतक्या पाण्यांत जाऊन देवीची शपथ घ्यावयाला सांगतात. ( ३ ) अंतरावर दोन रंगणें काढून, त्यांत दोघेजण उभे मनुष्य एकाजवळ उभा रहातो, व त्याचा स्नेही तोहमतदार एकाला शिवून पळत जाऊन दुसऱ्याला शिवून परत येतो. तो पहिल्याला शिवल्याबरोबर नदींतला इसम बुडी घेतो. तोहमतदार दुसऱ्याला शिवून परत येईपर्यंत तो तसाच पाण्यांत राहिला म्हणजे तोहमतदार निर्दोषी आहे, असें समजतात. तोहमतदारानें गुन्हा केला असल्यास त्याला रक्ताची गुळणी येऊन तो मरतो असें ह्मणतात. (४) तोहमतदार नऊ किंवा एकवीस पिंपळाची पानें हातांत घेऊन त्यांवर लाल तापविलेली कुऱ्हाड ठेवून नऊ दहा पावलें जातो; पोळलें नाहीं 'म्हणजे तो निर्दोषी समजावयाचा. वाळूत सात काठ्यांच्या राहतात. तोहमतदार नदींत उभा रहातो..