Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंगोटी पारधी. १६३ राहतो. खाटांच्या भोंकांत ते माल दडवितात, सबब त्यांचें सुंभ उलगडावें तसेंच झाडा चालला असतां ते पाण्याला वगैरे बायकामुलें पाठवितात, व त्यांच्याबरोबर माल लांबवितात. तरी पोलिसानें त्यांच्या मागोमाग 'जाऊन त्यांचा झाडा घ्यावा. डेऱ्याजवळची जागाही नांगरून काढावी. असें ह्मणतात कीं, हे लोक ज्या मुलुखांतून जातात, त्यांमध्यें सोईस्कर ठिकाणीं जिनसा पुरून ठेवितात, आणि अनेक वर्षांनीं ठेवल्या ठिकाणीं अचूक घेऊन त्या घेऊन जातात. टोळींतील इसमांना सारखी वांटणी मिळते, मग ते प्रत्यक्ष गुन्हा करोत किंवा न करोत. विधवांना आणि तुरुंगांत पडलेल्यांच्या बायकांना निम्मा वांटा मिळतो. लंगोटी पारधी. हे लंगोटी नेसतात, केंस वाढवितात, आणि परसाकडेला पाणी नेत नाहींत. ह्यांची वस्ति मध्यप्रांतांत आहे. ह्यांच्यांत तीन गोर्ते आहेत:-- चव्हाण, पोहार, साळुंकी. चव्हाणांची 'देवी अंबा, पोहारांची मरी माता, आणि साळुंक्याची काली. या देव- · तांना सर्वसाधारणतः भवानी ह्मणतात. ते मराठी आणि उर्दू जलद बोलतात, परंतु त्यांचें बोलणें नवशिक्या गुजराथ्याप्रमाणें असतें. सांकेतिक शब्द. जान -इशाली बरबरा जुपडा चोरीचा माल घे- कुमाई धान्याची हलकी ... णारा. चोरी. दरोडा. चोरी. कुर्ना घरफोडी. काळी कुत्री गोबर लहान दरोडा. घरफोडीचें हत्यार. पोलीस. चोरीचा माल.