पान:गुन्हेगार जाती.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ गुन्हेगार जाती. करतांना सांसी आणि बेरियांच्या टोळींतील इसम वेगवेगळे करून त्यांना विचारावें; आणि एकमेकांना खुणा करतां येणार नाहींत, इतक्या अंत- रावर त्यांना ठेवावें. त्यांच्यांतील सशक्त पुरुष बहुधा डेऱ्यांत सांपडत नाहींत. ते जवळच्या जंगलांत किंवा दरींत दडून बसतात. गुन्ह्यांची हत्यारों:- हत्यारे बाळगण्याची परवानगी आहे अशा मुलुखांत सांसी आणि बेरिये तलवारी, बंदुका घेऊन गुन्हे करतात. इतर ठिकाणीं ते लाठ्या, गोफण धोंडे, सुया, कु-हाडी, खराच, लोखंडी मेखा, आगकाड्या, तेलवात, वगैरे घेऊन गुन्हे करतात. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरलेल्या मालाचे ते पैसे करून वांट- या करतात. तोंपर्यंत तो डेप्यानजीक एखादें वारूळ किंवा नाल्यांतील झाड वगैरेंजवळ, किंवा डेऱ्यांत चुलीजवळ, अगर जनावरांच्या मेखांजवळ पुरतात. सांसी कधीं कधीं सामानाच्या घडवंचीखालीं आणि बेरिये अंथरुणाखालीं चोरीचा माल पुरतात. चोरलेलें जवाहीर आणि रोकड ते कधीं कधीं गोधडी किंवा वळी यांमध्यें शिवतात, किंवा ज्या पोत्यांत किंवा मडक्यांत घाण, वाळलेले मांस, चरबी असेल त्यांत लपवितात. प्रवासांत या जिनसा त्यांच्या बैलांवर किंवा तट्टांवर असतात. तेव्हां त्यांचा झाडा घेतला तर वायां जाणार नाहीं. ज्या विशेष मौल्यवान जिनसा डेप्या- पाशीं पुरलेल्या असतात, त्या टोळींतील एक दोन इसम पुढच्या तळा- वरून रात्रीं येऊन घेऊन जातात, आणि तेथें पूर्ववत् पुरून ठेवितात. सोनार, वाणी, कलाल, सराफ, आणि कधीं कधीं पाटील पटवारी त्यां- च्याकडून चोरीचा माल घेतात. चोरलेलीं ढोरें ते मारून खातात, किंवा लांबच्या बाजारांत विकतात. तीं ओळखण्याची भीति नसली तर त्यां- वर ओझें घालून नेतात. उचललेलीं बकरीं, मेंढरें ते ताबडतोब मारून खातात. सांसी आणि बेरिये यांच्या बायकांचा झाडा एखाद्या बाईकडून घ्यावा; कारण त्या मायांगांत लहान लहान डाग आणि पैसे लपवितात. पुष्कळ चुन्या असल्यामुळे त्यांचे घागऱ्याला एखादा मोठा चोरखिसा .