Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांसी आणि बेरिये. १६१ बाहेर नेणें झाल्यास तो एक दोघे मदतीला बोलावितो, व दुसऱ्या खो- लींत जाणें झाल्यास वात लावून तिचा ठाव घेतो. रोकड, जवाहीर, कपडे, भांडी व डेरा जवळ असल्यास खाण्याच्या जिनसाही, जें हातीं पडेल ते ते घेतात. निजलेल्यांच्या अंगावरचे दागिने काढण्यांत ते फार पटाईत असतात. ते सहज काढतां न आले तर बेलाशक ते ते ओर -- डून घेतात. घरांतले लोक जागे झाले तर ते पळून जातात. प्रसंग पडलाच तर आंतल्या इसमांची सुटका बाहेरचे इसम फार प्रयत्नानें करतात. सांसी आणि बेरिये प्रेताचा पोषाख निजलेल्या इसमावरून फिरवितात. अशानें निजलेले इसम जागे होत नाहींत अशी त्यांची समजूत आहे. मेंढ्या किंवा ढोरें चोरणें:- गाड्यांच्या तळांवरून, गोठ्यांतून, मेंढवाड्यांतून किंवा चारणीच्या मैदानांतून मेंढ्या आणि ढोरें ते चोर- तात. गरीब जनावरांच्या आश्रयानें द्वाड जनावर ते पकडतात, त्याच्या शिंगाला दावें लावितात आणि तें घेऊन जातात. मेंढवाड्यांत जाऊन लट्ठ लठ्ठ मेंढ्या चापसून त्या ते लांबवितात. मालगाडी हळू चालली ह्मणजे फळीवर किंवा पायरीवर चढून पोतीं ते उचलून घेतात, किंवा लोखंडी आंकडीच्या लांब काड्यांनीं तीं खालीं पाडतात. आगगाडींत खिडकीपाशी बसलेल्या बाईचे दागिने ते ओर- बडून घेतात, किंवा चोरलेला माल खिडकीवाटें बाहेर झोंकून पुढें उच- लून घेतात. गाडी चालू झाली म्हणजे डब्याच्या दरवाज्याजवळचें गांठोडें ते उचलतात. सांसी आणि बेरिये ह्यांच्या तळाचा झाडा घेणें झाले तर पोलिसांनी पुष्कळ लोक बरोबर घ्यावेत. कारण त्यांच्या बायका फार कजाग असतात. त्या पोलिसापुढें नागव्या होतात, त्यांच्या कपड्याला झोंब- तात, किंवा त्यांच्या पुढें पोरें आपटण्याची भीति घालतात. बेरियांच्या बायका तर लघवी करून त्यांच्या तोंडावर फेंकतात. पोलि- सची संख्या कमी पडल्यास हे लोक त्यांना पिटून लावितात. तपास ११