पान:गुन्हेगार जाती.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० गुन्हेगार जाती. वगैरे ठेविले असतात त्या ठिकाणी टोळी पुन्हां थांबते; आणि तेथून होईल तितक्या त्वरेनें परत जाते. टोळींतील एखाददुसऱ्या इसमाबरो- बर ते चोरीचा माल देतात, आणि तो तळाजवळ जमिनींत पुरतात व तळ हलला म्हणजे बाहेर काढतात. डेऱ्यांत जाऊन पैसे करीपर्यंत ते चोरीच्या मालाची वांटणी करीत नाहींत. वांटे करतांना प्रत्येकजण गंगेची किंवा कालिकेची शपथ घेऊन सांगतो कीं, मीं चोरून कांहीं एक ठेविलें नाहीं. सांसी अविचारी असल्यामुळे एखादे वेळेला ढवळ्या दिवसां धर्मशाळा, यात्रा किंवा रेल्वेवरील उतारू बसण्याची जागा वगैरे ठिकाणी दरोडा घालतात. घरफोडी:- अगोदर घराच्या वाटा वगैरे नीट पाहून ठेवून अंधे- या रात्रीं ते घरफोडी करतात. आजूबाजूच्या गल्ल्या आणि वाटा रोखून ठेवून गपचीप मध्यरात्रीं ते त्या घरी जातात. त्यांच्याजवळ लाठया, गोफण, धोंडे असतात. नंतर एक चलाख इसम खिडकी फोडून किंवा खराच्यानें ( एक फूट लांब खिळा, त्याला बोंड व पोलादाचें पाणी दि- लेलें चापट टोंक असतें ), कसाबाच्या सुरीनें किंवा एखाद्या मोठ्या खिळ्यानें बगली किंवा रुमाली पद्धतीनें भिंतीला भोंक पाडून आंत शिरतो. आंत शिरण्यापूर्वी काठीला फडकें गुंडाळून आंत कोणी जागे आहे कीं नाहीं हैं ती आंत फिरवून तो शोधतो. आंत उजेड किंवा हवा येऊं नये म्हणून भोंकाच्या तोंडाशीं ते कापड आडवें धरतात. सर्व ठीक आहे हें दर्शविण्यासाठीं बाहेर एक इसम चुटकी वाजवीत राहतो, घरांत जो जातो त्याच्याजवळ तुपांत किंवा तेलांत भिजविलेली एक बात, आगकाड्या आणि एक सुरी असते. वात उजळून कोण कोठें निजलें. आहे, कोठें काय जिन्नस आहे हें तो पाहतो, व निजणारांना गाढ झोप लागली आहे कीं नाहीं याचा ओणव्यानें कानोसा घेतो. लहान बे वगैरे तो जसेचे तसेच बाहेरच्यांना देतो, फोडून आंतील जिनसा बाहेरच्यांना देतो. आणि मोठाल्या जड पेट् मोठाल्या जड पेट्या