पान:गुन्हेगार जाती.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंजारे. रीचे बटवे दृष्टीस पडले ह्मणजे लंबाण्यांनी ( बंजाऱ्यांनी ) गुन्हा केला अर्से समजावें. क्वचित् प्रसंगी कैकाडी वगैरे जातीही असल्या जिनसा दुस- व्यावर संशय जावा ह्मणून मुद्दाम तेथें ठेवितात. तसेंच लांबच्या तांड्यांनीं गुन्हा केला असल्यास गांवचे बंजारे फुटतात, मात्र तपासाचें काम जरा खुबीनें केलें पाहिजे. लंबाण्यांनी गुन्हा केला असे वाटल्यास तांड्याची हजिरी घ्यावी, आणि गैरहजर घायाळ इसमांबद्दल बारीक तपास करावा. दोन ते पांच गोवरिया बंजारे संस्थानांतून अफू आणण्यासाठीं सड- केनें किंवा रेल्वेनें जातात, आणि धोपट रस्त्याच्या जवळपासच्या आड- रस्त्यानें परत येतात. ते रात्रीं चालतात व दिवसां मुक्काम करून आस- पास अफू पुरतात. घरीं पोंचल्यावरही ते अफू पुरून ठेवतात आणि अफीमबाजांना किरकोळीनें विकतात. गुन्ह्यांची उपकरणें:- जबरीचे गुन्हे करण्याचे काम कोयते, काठ्या, गोफणगुंडे, सुऱ्या, भाले व मिळाल्यास बंदुका, तलवारी यांचा बंजारे उप- योग करतात. मुख्यत्वेंकरून कर्नाटकांत ते, लोकांस भिवविण्यासाठीं व आपण सशस्त्र आहों हे दाखविण्यासाठीं, कधीं कधीं आपटबार काढतात. - चोरीच्या मालाची निर्गतिः- रोकडशिवाय बाकीचा माल तां- ड्यांच्या नजीकचे नाले, जुन्या विहिरी, वगैरेमध्यें ते पुरतात. लागलीच विकला नाहीं तर ते धान्य व कापूस, गवत, पाला किंवा वळ्हयीखालीं दडवितात. कपड्यांचे कांठ काढून ते विकतात, आणि बिनकांठांच्या कडांना दुमट घालतात. कलाल, लिंगायत, मारवाडी, तांबट, गांवचे पाटील व सावकार ह्यांना ते चोरीचा माल विकतात. लहान डाग ते बायकांच्या कपड्यांत, निऱ्यांत अगर अन्न शिजविलेले भांड्यांत ठेवितात, किंवा गोण्यांत शिवतात. चोरीचे दागिने वांटून न घेतां ते त्यांचे टक्के करतात. साल्याला दोन हिस्से मिळतात. थापथुपीनें मालकीचे दाखले उप- टून बंजारे चोरीचीं जनावरें एकएक, दोनदोन लांबच्या बाजारांत अगर खाटकांना विकतात किंवा क्वचित् सांभाळण्यासाठीं स्नेह्याजवळही देतात.