पान:गुन्हेगार जाती.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांसी आणि बेरिये. १५९ करणें वगैरे गुन्हे ते करतात. त्यांची बायकामुलें उचलेगिरी वहा लहान चोऱ्या करतात. सांसिनीपेक्षां बेरियांच्या बायका अट्टल अस- तात. त्या वस्तिरहित घरांचीं कुलपें काढून सांपडेल तें चोरून नेतात गुन्ह्यांची पद्धतिः- दरोडा :- सांशांच्या टोळींत वीस इसम अस- तात. ते परकी माणसांकडून बातमी काढीत नाहींत, व त्यांचा विश्वास धरीत नाहींत. परंतु गुन्हे करण्यासाठीं सांसी आणि बेरिये एक होतात. टोळीतील एक दोन हुषार इसम मुक्कामाच्या जागेभोवती घिरट्या घाल- तात. आणि एखादें लग्न वगैरे वाट चालत आहे कीं काय, तें केव्हां. निघणार, त्यांत मंडळी किती आहे वगैरे शोध घेतात. त्याप्रमाणें बेत ठरवून टोळी दिवसां किंवा रात्रीं हल्ला करण्यासाठी दडून बसते, आणि शिकार आली कीं बाहेर पडून हल्ला करते. दोन्ही बाजूंला दोघेजण रस्ता अडवितात आणि बाकीचे ताज्या तोडलेल्या काठ्या, गोफण, धोंडे, सुऱ्या, कुन्हाड वगैरेंसह हल्ला करतात. उत्तेजन वगैरे देणें झाल्यास नाईक पुरभव्याप्रमाणें हिंदुस्थानींत बोलतो. कोणत्या घरावर दरोडा घालावा हैं शोधण्यासाठी टोळीतील एखादा इसम, तळें, विहीर, किंवा घाटावर इकडे तिकडे फिरत राहतो, आणि दागदागिन्यांनी लढलेली एखादी बाई दिसली म्हणजे तिच्यामागें जाऊन तिचें घर पाहून ठेवितो. गुन्ह्याचे स्थानापासून सुमारें एक मैलावर एखादें झाड, विहीर किंवा नांगरलेल्या जागेजवळ टोळी थांबते. तेथें ते फाजील कपडालत्ता काढून ठेवितात. गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ आले म्हणजे ते दगडांचा सपाटा चालवितात. नायकाच्या सांगण्याप्रमाणें जो तो नेमल्या ठिकाणावर जातो. ते रस्ते आणि बोळ यांवर सक्त पहारा ठेवितात, कुन्हाडीनें दारें फोडतात व बाय- कांना तपासून त्यांचे दागिने काढून घेतात. सांसी बहुधा बायकांची अ घेत नाहीत. ते घरांतील पुरुषाला माल काढावयाला लावितात, पेट्या वगैर फोडून तपासून घेतात, व कोणी आडवें आलें तर मार- हाण करतात. इतक्यानें भागलें नाहीं तर त्यांची मजल खुनापर्यंत देखील जाते. याप्रमाणें तास दोन तासांत काम करून जेथें कपडे