________________
सांसी आणि बेरिये. १५५ ताही गुन्हा करीत नाहींत. तेथें एखादें चांगलें घर दिसलें तर दहा पंधरा मैलांवर तळ हलवितात, आणि कांहीं दिवस लोटल्यावर तेथें घर- फोडी करतात. गुन्ह्यांसाठी पुरुष लहान लहान टोळ्या करून रेल्वेनें आणि सडकेने प्रवास करतात. पायरस्त्यानें ते ३० ते ५० मैलांत गुन्हा करतात आणि रेल्वेनें ते हवे तितकें लांब जातात. स्वरूप :- सांसी आणि बेरिये चपळ, मजबूत, टणक, मध्यम बांध्याचे व उंचीचे असतात. ते आपला तळ गांठण्यासाठीं चाळीस पन्नास मैल सहज चालून जातात. गुन्ह्याचे काम त्यांना माया, दया बिलकुल नसते व ते कधीं माघार घेत नाहींत. सांशांच्या बायका नाजूक, देखण्या व बांधेसूद असतात. बेरियांच्या बायका गदळ, अस्ताव्यस्त आणि रासवट असतात. सांसी डोकें व दाढी वाढवितात, परंतु अलीकडे हजामत करूं लागले आहेत. ते कधीं खाटांवर निजत नाहींत ; बेरिये मिशा व शेंडी ठेवितात आणि खाटांवर निजतात. सांशांच्या बायका पांढरें नेसत नाहींत, व कांचेच्या लांकडाच्या किंवा करवंटीच्या बांगड्या घालतात. बेरियांच्या बायका मळकट पांढरी वस्त्रे नेसतात, बांगड्या घालीत नाहींत आणि क्वचित् गोठ घालतात. पुरुष धोतर, कुडतें, जुना अंगरखा व परदेशी तऱ्हेचा फेटा घालतात. बेरियांचीं धोतरें पांढरी किंवा भगवीं असतात. सांसी आणि बेरिये धोतर आडबंद ( पुढें गांठ मारून ) नेसतात. त्यांच्या गळ्यांत दोन किंवा अधिक पदरी पोवळ्यांची व सोन्याच्या मण्यांची कंठी आणि सोन्याचा किंवा रुप्याचा टांक असतो. त्यावर रामदेव पिराची किंवा वडलांची घोड्यावर बसलेली मूर्ति असते. त्याला 'झुजा ' म्हणतात. बायकांचा पोषाख व दागिने मारवाडणीप्रमाणें असतात; कांठांचा घागरा, कुडतीं, आंगिया आणि ओढणी. त्या गळ्यांत पोतीमध्ये ' चीड ' ( कोयंड्यासह कलदार रुपया ) लटकवितात, डाव्या कानांत लवंग घालतात आणि दांतांना मिशी (दांतवण ) खूप लावितात. सांशांच्या बायका नाकांत बुलाक