पान:गुन्हेगार जाती.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ गुन्हेगार जाती. घालतात. पुरुष आणि स्त्रिया चढाऊ जोडे घालतात. कोल्हा खेरीज- करून सर्व प्रकारचें मांस सांसी लोक खातात. त्यांच्या डेऱ्यांत वाळवि- लेल्या मांसाच्या थैल्या आणि चरबीचीं मडकी असतात. बेरिये मासे आणि गोमांस खात नाहींत. त्यांच्या बायका आणि मुलें पुरुषाप्रमाणें हुक्का ओढतात. दोन्ही जातींचे लोक फार दारूबाज असतात, आणि भांग, गांजा व तमाखू ओढतात. दोन्ही जातींच्या बायका तपकीर ओढतात. त्यांच्यांत जी कसब करते तिचें नांव बेरिये आपल्या डेन्याला (तांड्याला ) देतात. सांसी आपल्या “ सरगण्या " चें नांव डेऱ्याला देतात. गुजराथमध्ये आढळून येणारे सांसी किंवा छरे फार गदळ राहतात. त्यांना पोपलिये ह्मणतात. त्यांच्या बायका, सुटने किंवा पायजमे आणि कुडतें घालतात. सांसी आणि बेरिये लहानपणीं आपल्या मुलाला पोटावर आणि छातीवर डागतात. बायका नाक, हनुवटी, छाती, कानसूल, मनगट, हात आणि पोटऱ्यांवर गोंधतात; पुरुष खांदा, मनगट आणि पाठीवर गोंधून कट्यार किंवा विंचू काढतात. ते फार भांडकुदळ असतात, आणि दारूनें झिंगले म्हणजे मारामारी कर- तात. त्यामुळे सांशांचे डोक्याला पुष्कळ खोंका असतात. सांसी सर्व जातींचे लोक आपल्यांत घेतात, व गंगा किंवा कालिकेची शपथ घेतात. ते भांड्यांत पाणी, मीठ, कोळसा आणि ज्वारीचे दाणे घालून तें गंगेची शपथ घेतांना उचलतात, आणि कालिकेची शपथ घेतांना बाटलींतून थोडीशी दारू जमिनीवर ओततात. पुष्कळ लूट मिळाली झणजे ते खाण्यापिण्याची चंगळ करतात. दोन्ही जातींचे लोक मोठे अबोल अस- तात, आणि कितीही विचारपूस केली तरी स्तब्ध राहतात. पण एखादा भेया किंवा दारू त्यांच्या तोंडाची खीळ उचटते. त्यांच्या मुलांना एकी- कडे नेऊन प्रश्नामागे प्रश्न केले तर त्यांच्याकडून महत्वाची माहिती मिळते.