________________
सांसी आणि बेरिये. संज्ञाः-यांना सांसी, कंजार, आदोदीय, पोपट, घागरे पलटण, हाडकुटे, छार, गिधीये, हबूडे, कजरहतिये, कंचीरे, चिरोखरवाल, भांडू, भानतुडे, कंजर-बेडिये, पोमळे, बागोरिये, उंचालेंगा ( आंखूडवंडी ) किंवा बैलवाले कंजार ह्मणतात. त्यांच्या दोन पोटजाती आहेत. माल्ह आणि बिधू अथवा काळकर. त्यांचीं मुख्य गोतें खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत:- झोजा, बेलिया, पटीया, गेहला, चंदुवाडा, तमैची, गड्डू, कोठन, धापो, रायचंद, स्याहान, दहीया, पोपट, साध, भुरा, भाना, दरसा. वस्तिः- ही जात फिरस्ती आहे, तथापि भरतपूर व धोलपूर संस्थानांत यांचे कांहीं लोक सांपडतात. 66 सरगणा " गुन्ह्यांचें क्षेत्रः- ते बायकापोरें, गाईबैल, टोणगे, गाढवें, तहें, शेळ्यामेंढ्या आणि विजाती टेरीअर कुलंगीं कुत्रीं घेऊन फिरतात. एका टोळींत बहुधा वीस बिन्हाडें असतात. सांसी गांवापासून दोन तीन मैलांवर पाण्याच्या आसपास पिकाच्या किंवा जंगलाच्या आडो- शानें आडरानांत उतरतात. दर डेऱ्याला नाईक किंवा असतो. त्याची निवडणूक त्याच्या कर्तबगारीवर असते, आणि गुन्ह्याचे वेळीं तो काम करो अथवा न करो त्याचा वांटा शेंकडा पांचांनी अधिक असतो. सांसी “ सरकी " ( गवती पाल ) मध्ये राहतात. ज्या गांवांत किंवा जेथील पोलिसांमध्ये त्यांचे स्नेही असतील अशा आगाऊ ठरविलेल्या गांवानजीक बरसातींत अनेक टोळ्या गोळा होतात, तेव्हां तळांवर शेंदोनशांवर इसम असतात. उघाडीचे दिवसांत सशक्त लोक गुन्ह्यांसाठीं तळाबाहेर पडतात. पावसाळा संपला म्हणजे पुन्हां त्यांचें भटकणें सुरू होतें. मेंढ्यांची चोरी सोडून ते तळाचे गांवीं दुसरा कोण-