पान:गुन्हेगार जाती.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पठाण. १५३ मोठ्या शिताफीनें लपवून आणतात; कधीं उशांमध्यें, कधीं कुराणासार- ख्या पुस्तकामध्यें वगैरे. १८९८ ९९ साली पुण्यास साहेब लोकांच्या येथें चोऱ्या झाल्या; त्यांतील माल पठाण पलटणीच्या सुभेदाराच्या घरीं निघाला. एखाद्या मोठ्या गुन्ह्यांत सांपडले म्हणजे ते पोलिसाला अटक करूं देत नाहींत. त्यांच्यावर सक्त पहारा ठेवावा. विचारपूस केली तर ते वेड्याचें सोंग घेतात. गुन्ह्यांची हत्यारों:- दरोड्यासाठीं ते लोखंडी विडीच्या मोठमोठ्या काठ्या, सुया, कट्यारी, तलवारी, बंदुका, पिस्तुल व रिव्हॉल्व्हर नेतात. कधीं कधीं कुन्हाडी- पहारी नेऊन ते त्या तेथल्या तेथेच टाकून देतात. घरें फोडण्यासाठीं कधीं कधीं ते खिळे, पहारी, गिरमिटें, मेणबत्त्या, आग- काड्या, किल्ल्या वगैरे घेऊन जातात. पठाणांच्या घरांत केव्हां केव्हां तराजू, वजने आणि सोनें-रुपें गाळण्याचें सामान सांपडते. चोरीच्या मालाची निर्गतिः- त्यांना एकमेकांचा भरंवसा नसतो. चोरीचा माल ते ताबडतोब वांटून घेतात. टोळीतील इसमांचा एक- मेकांशीं फारच स्नेह असला तर एक दोघे पुढारी मौल्यवान् जिनसा विकून टाकतात आणि मग पैसा वांटून देतात. दरोडा मारून रेल्वेनें प्रवास करतांना चोरीचा माल ते एखाद्या एतद्देशी मुसलमानाजवळ देऊन त्याला दुसऱ्या डब्यांत बसवितात. एका पठाणानें आपल्या वृषणाखाली माल लपविला होता. मारवाडी, बोहरी, खोजे, गुजर, सोनार, सराफ, सावकार वगैरे लोक त्यांचेजवळून चोरीचा माल घेतात. एका प्रांतांतील माल ते दुसऱ्या प्रांतांत विकतात. ते कधीं कधीं चोरीचा माल “ गुड्यांत " ( सामानाचा कातडी थैला) घालून एखाद्या विश्वासू स्नेह्याबरोबर किंवा आप्ताबरोबर देऊन आपल्या मुलुखांत पाठवितात. कधीं कधीं चोरीचा माल ते आपल्याच घरांत चुलीखालीं किंवा झाडाखालीं पुरून ठेवितात. एकदां तर चोरीचा माल एक पठाण अंगावर घालून फिरत होता.