पान:गुन्हेगार जाती.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ गुन्हेगार जाती. ठरवितात. त्या स्थानापासून एक दिवसाच्या टप्प्यावरच्या निरनिराळ्या गांवीं एकेक दोघे दोघे जातात, आणि सर्वजण संकेतस्थानीं येऊन गोळा होतात. तेथें कोणी घरभेदे असल्यास ते त्यांना येऊन मिळतात, आणि अंधार पडल्यावर गुन्हा करण्याला सर्वजण निघतात. त्यांच्या- जवळ बहुधा रिव्हॉल्व्हर, बंदुका असतात. गांवांत पोलीस स्टेशन अस- ल्यास ते तेथील हत्यारें जबरदस्तीनें घेतात. घरफोडीच्या ठिकाणीं आ- ल्यावर ते चोहोंकडे दगडांचा वर्षाव करतात, व बंदुका झाडूं लागतात. ते दारें फोडून आंत शिरले म्हणजे कपाटें, पेट्या उचकतात, जमिनी खण- तात, कोने-कोपरे धुंडाळतात, माल काढून देण्यासाठीं घरांतील माणसां- ना मारहाण करतात, व कोणी आडवें झालें तर त्याचा जीव सुद्धां घे- तात. ते बहुधा बायकांच्या वाटेस जात नाहींत. एक दोन तासांत ते आपलें काम उरकून शेतांतून व जंगलांतून जे पसार होतात, ते थेट दहा पंधरा मैलांवर थांबतात; व तेथें सर्वांचा झाडा घेऊन मालाची वांटणी करतात. नंतर टोळींतील इसम वांकड्यातिकड्या मार्गानें आपल्या ठिकाणी जातात.. एखाद्या जिल्ह्यांत गुन्हे फार होऊं लागले म्हणजे पठाणही वाहत्या गंगेंत हात धुवून घेतात व गुन्हे करूं लागतात; कां कीं, आळ वहिमी जातींवर जातो. दरोडा मारण्याला ते कधीं कधीं घोड्यांवर जातात. जुनीं नाणीं मिळविण्याच्या किंवा परदेशीं नाणीं मोडण्याच्या मिषानें ते एखाद्या दुकानीं जातात, आणि सौदा करतां करतां एखाददुसरें नाणें लांबवितात. ते इतक्या लांबून दरोडा घालतात, आणि त्यांच्या टोळीतील इसम इतक्या लांबलांबून जमतात कीं, गुन्ह्या- चा पत्ता लावणें मुष्किलीचें होतें. पठाण रस्तालूट क्वचित् करतात. परंतु चांगली लूट मिळण्याची नक्की बातमी लागली म्हणजे ते रस्त्यावर दरोडा मारतात. पहिल्यानें सावकारांना साळसूदपणा दाखवून ते आपली साक वाढवितात; आणि सावकारानें शेंकडावळ देऊ करून पुष्कळ वसूल करण्याला पाठविलें म्हणजे पैसे तिकडे व तेही तिकडे. ते हत्यारें