पान:गुन्हेगार जाती.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुन्हेगार जाती. , देवदेव करणें वगैरेचा पूर्व खर्च तो करतो, आणि वीस किंवा अधिक साथी- दारांची टोळी बनवितो. कोठें डाका मारावयाचा ह्याची बातमी एक- जण टेहळणी करून काढतो. पण बहुधा ही खबर कलाल, स्थानिक मारवाडी किंवा बंजारे ह्यांच्याकडून मिळते. तसेंच गांवचे गुन्हेगारही बातमी देऊन टोळींत सामील होतात. बंजारे वाटेवरच्या झाडांच्या काठ्या काढून त्या, आणि गोफणगुंडे, कोयते, व कधीं कधीं मिळाल्यास तलवारी, बंदुकाही बरोबर नेतात. बंजाऱ्यांची डाका मारण्याची त इतर गुन्हेगारांहून भिन्न नाहीं. दरोड्याचे वेळीं पहिल्यानें ते दगडांचा वर्षाव करतात व गोफणगुंड्यांनीं आसपासचे रस्ते रोखतात. नंतर " दीन ! दीन ! " ह्मणत काठ्यांचा व दुसन्या हत्यारांचा सपाटा सुरू करतात. जवळ असल्यास, दहशत बसविण्यासाठीं तलवारी, बंदुकाही ते चालवितात. ते एकमेकांशी हिंदुस्थानींत बोलतात. पण बहुधा सांकेतिक अक्षरें उच्चारतात. माग चुकविण्यासाठीं ते परत जातांना टोळी फोडून आडरस्त्यानें जातात. तसेंच जावयाचें असेल पूर्वेस तर ते जातात पश्चिमेस; आणि ते वाटेनें फोल जिनसा फेंकीत जातात. दरोडा किंवा रस्तालूट झाल्यावर ते गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारें एक मैलावर थोडावेळ मुक्काम करितात, लूट नीट तपासून घेतात, आणि मग तांड्याकडे वळतात. कधीं कधीं तांडा या गांवचा त्या गांवीं जात अस तांना बंजारे चोऱ्या, दरोडे मारतात. बैलावर सामानाच्या गोण्या घालून त्याबरोबर झातारे बायका पुरुष जातात; आणि धट्टेकट्टे संकेतस्थानीं जमून झपाट्यासरसा एखादा दरोडा घालून पुनः तांड्याला येऊन मिळतात. झुंझुरका सकाळीं राखणदार झोंपीं जातात. अशा वेळीं ते पिकाची किंवा खळ्याची चोरी करतात. कांहींजण राखणदारावर नजर ठेवितात किं वा वेळ पडल्यास त्याचा समाचार घेतात; आणि बाकीचे गोण्यांत किंवा. घोंगड्यांत धान्य भरून चालते होतात. उभी पिकें ते बहुधा रात्रीं चोर- तात. ते घरीं हुक्का व बाहेर चिलीम किंवा चुट्टा ओढतात. गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ ह्या जिनसा किंवा कवड्या, शंख, भिंगें लाविलेले पानसुपा-