पान:गुन्हेगार जाती.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पठाण. १४९ पर्वा न करतां ते ती उगविल्याखेरीज राहत नाहींत. वायदा संपला कीं 'कुळाला उसासा देखील टाकूं देत नाहींत. तांबर्डे फुटलें कीं पठाण, सोटा घेऊन तगाद्यासाठीं दारांत आडवा तयार ! फिरून ये म्हटलें तरी आपल्या भोंवतीं चक्कर देऊन तेथेंच ! दम घर झटलें कीं नाक दाबलेंच ! ते कुळाला ह्मणतात कीं, आज हिशेब चुकता कर आणि पाहिजे तर पुन्हां आतांच नवीन कर्ज घे. कुळाला तेंच पाहिजे असतें. ते कुळाला पहिल्यानें गोडीनें घेतात, आणि जर नच जमलें तर मारपीट करा- वयाला सोडीत नाहींत. फेरीवाले पठाण, कापड, हिंग, चाकू, कातरी, सुऱ्या, सुकीं केळीं, चित्रें, सुरमा, औषधी, खोटें जवाहीर, खडे, वगैरे विकतात. कधीं कधीं ते सनया, बगलबाजा वाजवितात. ते कापड, शाली वगैरे पिकाच्या हंगामावर उधार देतात. तेव्हां गिन्हाईक फार खुष असतें. पण देण्याचे वेळीं मोठें जड जातें. कारण पठाण माराची. किंवा धर्म बाटविण्याची दहशत घालून पैसे उगवितात. लोकांत राम नाहीं म्हणून पठाणांचें हें सर्व निभतें. वेळेवर पठाण त्यांना गैरकायदा कैद करतात, पण लोक हूं कां चूं करीत नाहींत, किंवा त्यांच्याविरुद्ध पुरावा करावयाला धजत नाहींत. त्यांची जरब इतकी भयंकर बसलेली आहे कीं, कांहीं लोक जमिनीच्या भांडणांत त्यांना नौकर ठेवितात म्हणजे दुसरी बाजू मुकाट्यानें माघार घेते. ते कित्येक वेळां सरकारी नौकरां- नाही ठोकतात. सारांश, मेंढ्यांना जसा लांडगा तसा इकडच्या लोकांना पठाण होय. पुष्कळजण पलटणींत आहेत आणि ते फार चांगले लढ- वय्ये आहेत. परंतु पलटण कूच करण्याला निघाली म्हणजे त्यांतले कांहीं- जण गुन्हे करतात. वेषांतरः- गुन्हे करतांना ते बहुधा बोलत नाहींत. क्वचित् एखाद- दुसऱ्या उर्दू शब्दानें सोबत्यांना सावध करतात. ते कधीं कधीं पोलि- सचा जुना पोषाख चढवितात, धोतर किंवा तंग पायजमा नेसतात, तोंड झांकून घेतात, आणि जेथें गुन्हा करावयाचा तेथील लोकांचा नेहमींचा