पान:गुन्हेगार जाती.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ काकासाहेब, लोयेझवान गुन्हेगार जाती. "" ( बगदादपीर ) यांच्या नांवानें शपथ घेतात. पोकळ पायजमा, कापडाचा किंवा रुईचा अंगरखा, पगडी किंवा लुंगी आणि बहुधा तिच्या आंत एक टोपी ( कुला) हा त्यांचा नेह- मींचा पोषाख होय. कधीं कधीं कुला व बंडी ह्यांवर : जरीचें काम असतें. त्यांच्यांतील गरीब लोक कपड्यांना नीळ देतात. कांहीं लोक लांब केंस व दाढी ठेवितात आणि मोहमंद व स्वात कानसुलांवर कुरळीं झुलपें ठेवितात. त्यांची राहणी व पोषाख गदळ असतो. भाषा :- त्यांची जन्मभाषा पस्तु होय. त्यांना हिंदुस्थानी येतें, आणि ज्या जिल्ह्यांत राहतात तेथलीही भाषा ते कशीबशी बोलतात. सांकेतिक भाषा - ते व्यावहारिक भाषेनें एकमेकांना इंगित कळवितात. जसेंः-रस्ता तापला आहे (पोलीस पाळतीवर आहेत.) औषध ( गुन्ह्याचा बेत. ) हवा चांगली आहे, दोन तीन शाली पाठवा = सर्व ठीक आहे, हातीं घेतलेले काम पार पाडण्याकरितां दोघे तिघे या. जाड काठ्या, रुपये = माणसें इत्यादि. उपजीविकेची बाह्य साधने:- पठाण लोक व्याजबट्ट्याचा धंदा करतात व किरकोळ सामान विकीत फिरतात. कोणी घोडे, पलटणचे जुने बूट, पट्टे विकतात. सावकार लोक त्यांना रखवालीसाठी किंवा तगाद्यासाठीं नौकरीस ठेवितात. ते कोठें गाड्या हांकतात व मजुरीही करतात. कांहीं रेल्वेवर किंवा कचेऱ्यांत शिपाई, रामोशी राहतात; कोणी चहा, कॉफी, धान्य, लांकडें, मोच्याचें, शिकलकराचें वगैरेंची दुकानें घालतात. कांहींजण भीक मागतात, दवा, दारू विकतात, आणि मशिदींत “ बांगीची " नोकरी भिल्ल, भंगी, कुणबी, मोठ्या रेल्वे बिनपतीच्या लोकांना ते कर्ज देतात. नाहींत, म्हणून लोकांना वाटतें कीं हें बरें आहे. त्यांचें व्याज अतोनात जरब असतें, आणि कितीही लहान रक्कम असली तरी भाडेंखर्चाची करतात. महार, मांग, कोळी, स्टेशनवरील हलके नौकर वगैरे ते तारण किंवा दस्तऐवज घे