पान:गुन्हेगार जाती.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० गुन्हेगार जाती. पोषाख घालतात. ते आपलीं व आपल्या गांवांचीं नांवें वरचेवर बद- लतात. त्यांना ओळखण्यासाठी खालील माहिती अवश्य आहे:- नांव, बापाचें नांव, जात, पोटजात, गांव, जिल्हा, “ मलिक " किंवा मुख्याचें नांव, चेहरेपट्टी आणि आंगठा. गुन्हे:- जबर व्याज, धाक घालून पैसे उपटणें वगैरेंपासून त्यांच्या गुन्ह्यांना आरंभ होतो. आणि ते एखाद्या ठिकाणीं ठाणें करून राहिले, व तेथें त्यांच्या जातीचा जमाव जुळला म्हणजे आसपासच्या गांवांत त्यांची धामधूम बोकाळते. ते जमवाजमव करून दरोडे, रस्तालूट, घर- फोडी, चोऱ्या वगैरे गुन्हे अतिक्रूरतेने करतात. दक्षिणेंत ते देवळांत दरोडे मारतात आणि उत्तरेकडे बंदुका चोरतात, अशी जनवार्ता आहे. सूड घेण्यासाठी किंवा मोठ्या गुन्ह्यांत त्वेषांत येऊन, ते खून किंवा जबर दुखापत करतात. बहुतेक पठाण वहिमी लोकांकडून चोरीचा माल घेतात. ते गैरकायदा हत्यारें, दारू व अफू आणतात व बेसुमार जुवा खेळतात, क्वचित् खोट्या नोटा चालवितात, आणि खरे म्हणून खोटे दागिने विकतात. रस्त्यांत एखादा जिन्नस किंवा खोटा डाग ठेवून तो जाणाऱ्या येणाऱ्यांनीं घेतला म्हणजे त्यांजजवळून कोणाला न सांगण्या- बद्दल ते पैसे घेतात. अगर तो घेणार इतक्यांत स्वतःच उचलून घेऊन हो ना करून तो त्याचे माथीं मारतात, आणि तो जी रोकड देईल ती घेतात. सावकाराच्यातर्फे वसूल केलेल्या पैशाचा ते विश्वासघातही करतात. गुन्हा करतांना ते सोमल किंवा भुलीचें औषध देतात असा संशय आहे. ते मुलें पळवून त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घेतात. उत्तरेकडे ते खिसाचोरी करतात, व रेल्वेवरील धर्मशाळांत, धक्क्यावर किंवा आगगाडींत निजलेल्या उतारूंची चोरी करतात. अदेझाई, हस्त- नगर आणि मतनी येथील पठाण पैसे घेऊन मारेकऱ्यांचे काम पत्करतात. गुन्ह्यांची पद्धतिः- जुगार आणि वहिमी लोकांकडून बातमी का- दून ते घरफोडी करतात. दारे, खिडक्या फोडून किंवा भिंतीला मोठे