पान:गुन्हेगार जाती.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पठाण. १४७ कंदाहार, पेशावर येथून येतात. मुंबई इलाख्यांत आढळतात ते बहुतेक सफझै (यांत खुडुखेल येतात ), वरचे व खालचे मोहमंद ( यांत हलीमझे, तरकझे, बैझे, खवैझे येतात ), तर्कानी ( यांत सलारझे येतात ) साफी, आफ्रिडी ( विशेषत: उस्मानखेल, सुलेमानखेल ), उत्खेल आणि काकड असतात. सिंधी, बलुची बायका पोरांनिशीं हिंडतात. त्यांना इराणी ह्मणतात, व ते पठाणांहून भिन्न असतात. वस्ति आणि गुन्ह्यांचे क्षेत्र:- पठाण फिरस्ते नाहींत. ते अफ- गाणिस्थान व वायव्य सरहद्द येथून येतात, आणि कोठेंतरी वस्ति करून आसपासचीं खेडीं फिरतात. मुंबई, घाटकोपर, कुर्ले, पुणे, हुबळी, बेळ गांव, सुरत, अहमदाबाद, वगैरे ठिकाणीं ठाणें देऊन त्यांनी एकजुटीनें पुष्कळ गुन्हे केले. वस्तीच्या गांवापासून बऱ्याच अंतरावर ते मोठाले व टोळीचे गुन्हे करतात. त्यासाठीं ते कधीं कधीं रेल्वेने शंभर मैलांवर प्रवास करतात. ते जबर पायपीट करणारे असल्यामुळे एका दमांत साठ मैल कांटतात. एका देवळावर दरोडा घालून ते दोन दिवसांत दीडशें मैल गेले. मुक्कामाच्या आसपास ते घरफोडी, चोऱ्या वगैरे करतात. ते बहुतेक सडे असतात. पण कांहीं इकडील बायका करून स्थाईक झाले आहेत. लोकसंख्या:- मुंबई इलाख्यांत त्यांची वस्ति दोन हजारां- वर आहे. स्वरूपः - ते लालबुंद, सुरेख, पिळदार, सशक्त, सतेज, पुष्ट, बांधेसूद, उग्र, मध्यम ते पुऱ्या उंचीचे असतात. त्यांचा स्वभाव लोभी, दगल- बाज व शीघ्रकोपी असतो, आणि राहणी थाटाची असते. ते इकडील लोकांना तुच्छ मानतात, आणि लोकही त्यांच्या उद्दाम वर्तनाला भिऊन त्यांच्यापासून लांच राहतात. निमाज वगैरे धार्मिक बाबी ते फार जपून पाळतात. स्वाती " अखून साहेब " व इतर पठाण " पीर बाबा,