पान:गुन्हेगार जाती.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ गुन्हेगार जाती. गुन्ह्यांची हत्यारें:- त्यांचा ग्यान ( दांडयाच्या टोकाला पाणी दिलेली पळी ) बौयांच्यापेक्षां लहान आणि सफाईदार असतो. मजबूत आणीदार चिमटा आणि आणीदार मुठीची सुरी ह्यांनी मोठालीं कुलपें ते फोडतात, आणि दाभण, नऱ्हाणी, वांकडे चाकू, पोलादी तारा, कान- कोरणीं, ह्यांनी लहान लहान कुलुपें काढतात. नऊ इंच लांब, एक इंच रुंद असा बांबूचा तुकडा, टोंकाला दुभाळका करून तो कवाडांच्या फटींतून घालून ते कडी उचटतात, किंवा मागें रेटतात. कोणी विचारलें तर सांगतात कीं, ह्यानें आम्ही भाकरी उचटतो. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते पार्सल करून पोस्टानें किंवा रेल्वेने पाठवितात. बहुधा तो ठिकठिकाणच्या दोस्तीतल्या खरेदीदाराला विकून मनीऑर्डरीने ते पैसे घरी पाठवितात. कधीं कधीं ते गोपीचंदन वस्त्रगाळ करून त्यांत कापूस घालून त्याची मूस तयार करून त्यांत सोनें-रुपें आटतात. चोरीचा माल ते कचित् जवळ वागवितात. त्याची व्यवस्था लावण्यापूर्वी ते तो माल मुक्कामाच्या जागेजवळ पुरतात. माल फार असला तर निरवानिरव होईपर्यंत तो तेथेंच ठेवून ते पुढे जातात. मग एकजण ब्राह्मण ज्योतिषाच्या वेषानें येऊन तपास घेतो कीं, परदेशांवर किंवा वैराग्यांवर चोरीचा वहीम आहे कीं काय ? आहे असें कळल्यास ते बरेच दिवसपर्यंत जेथल्या तेथें माल राहू देतात, नाहीं तर टोळी परत येऊन माल काढून घेते. गम्मत ही कीं, असल्या तपासासाठीं चोरीच्या घरीं सुद्धां जाऊन मालकाला कोण चोर होता, वगैरे मंत्राच्या योगानें सांगण्याची सदर औधीया बतावणी किंवा धाडस करतो. पठाण. संज्ञा:- ह्यांना रोहिले, काबुली, पेशावरी, खान, अफगाण, कंदा- हारी, पशतुनी, पेशीनी ह्मणतात. ते स्वात, बुनेर, बाजौर, तिन्हा,