पान:गुन्हेगार जाती.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

औधीये. १४५ खिसे कातरतात, गांठोडें उचलतात, आणि हातोहातीं चोरीचा माल लांबवितात. घरफोडी:- कोणत्या शहरांत अगर रहाळांत गुन्हा करावयाचा हैं ठरविल्यावर, तेथून तीन चार मैलांवरील मठांत किंवा देवळांत ते उत- रतात. आम्ही तीर्थवासी किंवा यात्रेकरू आहोंत, आणि वाटखर्चापुरती भिक्षा मागण्यासाठीं, किंवा मागें राहिलेल्या इसमांना मिळण्यासाठीं, थोडे दिवस मुक्काम करावयाचा आहे, अशी पुजाऱ्याला थाप देऊन त्याची मर्जी संपादन करतात. नंतर टोळी मोठी असल्यास ते तिच्या लहान लहान तुकड्या करतात. ह्या तुकड्या स्वतंत्रपणें गुन्हे करतात. पण एकजण मठांत अगर देवळांत सदैव असतो, आणि टोळींतील बाकीचे इसम जरूरीप्रमाणें एकमेकांना भेटण्यासाठीं वगैरे तेथें येतात. सारांश, ह्या मध्यवर्ती ठिकाणापासून सर्व व्यवस्था चालते. दोनतीन इसम आटा मागतां मागतां ज्यांतील इसम घर लावून गेले असतील, असें एकांत घर शोधून काढून त्याच्या मागच्या दरवाज्याचें कुलूप काढतात. एकजण आंत जातो. बाकीचे रस्त्यावर टेहळणी करतात. नंतर आंतील इसम चटकन् पेट्या, फडताळे फोडून दागदागिने काढून घेतो. वेळ सांपडल्यास ते पेट्या वगैरे जेथल्या तेथें ठेवितात, म्हणजे मालकाला ताबड- तोब संशय येत नाहीं. संधि सांपडल्यास मिळालेला माल सर्वजण वांटून घेतात, आणि वेगवेगळ्या रस्त्यांनीं मध्यवर्ती स्थानाकडे चालते होतात. कोणाला संशय येऊं नये, म्हणून एकमेकांशी ओळख नाहीं, असें ते परकी माणसाला भासवितात. या लोकांचा आपल्या घरीं व आजूबाजूला गुन्हे करणाऱ्या टोळ्यांशी पत्रव्यवहार चालतो. ते पुजारी, चोरीचा माल घेणारा इसम किंवा एखादा संभावित मनुष्य ह्यांच्या पत्त्यावर पत्रे मागवितात. कांहींजणांना नागरी लिपी लिहितां वाचतां येते. त्यांच्या पत्रांत ज्यांना पत्रे पाठवितात, त्या सर्वांचीं नांवें आरंभी असतात; आणि नांवाच्या पुढें “ वा हा प्रत्यय लावितात. जसें “ बिसनु वा. " १० 27