पान:गुन्हेगार जाती.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ गुन्हेगार जाती. उपजीविकेचीं बाह्य साधनें :- गुन्ह्याच्या पैदासीवर ते स्वदेशी आळसांत व ख्यालीखुशालींत दिवस काढतात. वेषांतरः- ह्या इलाख्यांत ते बैराग्याचे वेषानें भीक मागतात, अगर मिठाई, आइसक्रीम विकीत फिरतात. ते बैराग्याचा किंवा ब्राह्मणयात्रे- करूंचा वेष घेऊन गळ्यांत जानवें, रुद्राक्षांच्या किंवा तुळशीच्या माळा घालतात; व कपाळाला, मानेला गोपीचंदनाचे पट्टे उभे आडवे ओढ- तात. शिवाय त्यांचेजवळ भिक्षेची तुंबडी ( कटोरी ) असते. या वेषानें ते भोळ्या बायांशीं ओळख पाडून आसपासची बातमी काढतात. तसेंच टोळींतील एखादा इसम आपणाला हिंदुस्थानी वाणी ह्मणवितो, आणि दुकान लावतो. तेथें गप्पा ठोकावयाला मंडळी जमतात, त्यामुळे आयतीच इकडची तिकडची बातमी लागते. शिवाय आसपास हिंडणाऱ्या टोळीं- तील इतर इसमांना तेथें जमतां येतें, सामान ठेवितां येतें, व तेथून पत्र- व्यवहार करतां येतो. गुन्हेः- ते दिवसां घरफोडी, चोरी व ठकबाजी करतात, पण क्रौर्य-- युक्त गुन्हे करीत नाहींत. ते पूर्वी छप्परबंदांप्रमाणें खोटी नाणी करीत. गुन्ह्यांची पद्धतिः- ठकबाजी :- कवठाचे किंवा नारळाचे करवंटींत. तूप घेण्याला ते वाण्याच्या दुकानीं जातात, तिच्या भेगेला फडक्यांत गंडाळलेलें व आंत शिसें ओतून जड केलेलें बूच बसविलेलें असतें. त्या बुचासह तिचें अभंड करतात. नंतर ती साफ करण्यासाठीं म्हणून ते घे- तात, आणि हातचलाखीनें जड बूच काढून घेऊन त्याच्या जागी हलकें बूच बसवितात; व अशा तन्हेनें वाण्यास फसवून जास्त तूप उपटतात. ते सोनाराला किंवा चोरीचा माल घेणाराला एकांतस्थलीं नेऊन तेथें त्याचे पैसे लुटतात, आणि खरे म्हणून खोटे दागिनेही विकतात. चोरी:- त्यांची चोरीची पद्धत भामट्यांप्रमाणें आहे, पण ते रेल्वेत चोरी करीत नाहींत. ते लहान टोळ्या करून यात्रा, देवळें, स्नानाचे घाट वगैरे गर्दीच्या जागीं चोऱ्या व उचलेगिरी करतात, जवाहीर काढतात,