पान:गुन्हेगार जाती.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

औघीये. १४१ तात. भिलवाडे चोरीचा माल आणि जनावरें आपल्या मुलुखांतील ठाकूर, कलाल वगैरेंना विकतात. कधीं कधीं चोरलेलीं जनावरें ते कापून खातात, आणि कातडी विकतात. औधीये. संज्ञा:- ह्यांना स्वदेशी, आवधपुरी किंवा अयोध्यावासी म्हणतात. मुंबई इलाख्यांत ते आपल्यांला तीर्थवासी, बैरागी, रेवडीवाले, खंचेवाले ( मिठाई विकणारे फेरीवाले ), गयावळ आणि तेवारी ब्राह्मण असें ह्मणवितात. त्यांचे दोन वर्ग आहेत:-उंच, आणि नीच ( अकरमासे ). वस्तिः- ह्यांचा भरणा कानपूर व फत्तेपूर या जिल्ह्यांत आहे. अली- कडे ते इंदोरपैकीं गंगलखेडी येथें, व निजामशाहीपैकीं हैदराबाद, मोमि- नाबाद, उल्लूर, घडेंटी आणि हुल्लीखेडी येथें येऊन राहिले आहेत. शिवाय ते क्वचित् अलाहाबाद, लखनौ, हमीरपूर जिल्ह्यांतही सांपडतात. गुन्ह्यांचे क्षेत्रः- हे लोक भटकणारे आहेत. ते मुंबई इलाखा, मध्य- प्रांत, मध्य हिंदुस्थान, दक्षिण बंगाल येथें व जगन्नाथ ते रामेश्वरपर्यंत गुन्हे करतात. पंजाब, सिंध व गंगायमुनांमधील अंतर्वेदींत ते गुन्हे करीत नाहींत. लोकसंख्या:- ह्यांची खात्रीलायक गणती झाली नाहीं. स्वरूपः-त्यांचें मुख्य दैवत काली माई होय. ते आपापसांत भांड- तील, पण गुन्ह्यासंबंधानें त्यांच्या जातीचा आळा मोठा विलक्षण आहे.. ते सडसडीत, चपळ, टणक आणि पायशूर असतात. ते आपल्या मुलु-: खांत गुन्हे करीत नाहींत. इकडे गुन्हे करण्यासाठीं, जून महिन्यांत