पान:गुन्हेगार जाती.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० गुन्हेगार जाती. पेहराव होय. ते सर्व प्रकारचें मांस व अफू खातात, तंबाखू ओढतात, आणि अतिशय दारू पितात. त्यांची रहाणी गदळ असून त्यांच्या अंगाची धपधपा घाण येते. भिलवाडे पंचमहालच्या भिल्लांप्रमाणें दिसतात, व त्यांशीं त्यांचा रोटीव्यवहार होतो. भाषा:-

- खैरवाडी भाषा मारवाडीप्रमाणें असते. भिलवाडे भिल्ल- बोली बोलतात.

उपजीविकेची बाह्य साधनें : - खैरवाडे आपल्या मुलुखांत जमीन कसतात, व चौकीदार असतात. ते पलटणींत व पोलिसांत चाकरी धरतात. परमुलखीं ते लांकडें फोडतात, आणि गिरण्यांत, गोयांत व रेल्वेवर मजुरी करतात. वेषांतर:- क्रौर्ययुक्त गुन्हे करतांना खैरवाडे धाटा बांधतात. ते आप- णाला गुजर, जाट किंवा ठाकूर ह्मणवितात. भिलवाडे आपणांला भिल्ल ह्मणवितात. गुन्हे:- घरफोडी आणि दरोडे हे खैरवाड्यांचे गुन्हे होत. भिलवाडे जबरीची चोरी, रस्तालूट, दरोडे मारतात, आणि जनावरें चोरतात. गुन्ह्यांची पद्धति:- खैरवाड्यांची गुन्ह्यांची धाटणी उजळे मिन्यां- प्रमाणें, आणि भिलवाड्यांची भिल्लांप्रमाणे असते. भिलवाड्यांची टोळी मोठी असते, आणि कोणी आडवें आलें असतां ते मारहाण करतात. गुन्ह्यांची हत्यारें:-त्यांच्याजवळ तलवारी, बंदुका, तीरकमठे अस- तात. खैरवाड्यांच्या जवळ मजुरीचीं हत्यारें, काठ्या, सुऱ्या असतात. चोरीच्या मालाची निर्गतिः - चोरीचा माल खैरवाडे पुरून ठेवि- तात, आणि पुढें आपल्या मुलुखांतल्या वाण्यांना विकतात. ते रोकड मनीऑर्डरीनें घरी पाठवितात. बहुधा ते ज्या त्या ठिकाणी आपले मित्र करून ठेवितात, आणि त्यांच्या मार्फत चोरीच्या मालाची निर्गति लावि -