पान:गुन्हेगार जाती.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• मैले मिने. १३९ कापड आणि जवाहीर ते पार्सल पोस्टानें एखाद्या सोबत्याच्या नांवावर पाठवितात, किंवा क्वचित् प्रसंगी एखाद्या इसमाबरोबर आपल्या मुलुखांत घरीं पाठवितात. सोबत्याच्या नांवावर ते पैशाची मनीऑर्डरही घरीं पाठवितात. मैले मिने. संज्ञा :- यांच्या दोन पोटजाती :- खैरवाडे आणि भिलवाडे. खैरवा- ड्यांचीं गोतें:-चिता, डांकल, धावना, जोनरवाल, सिंगाल, सेवगन, मेर आणि पदीय. भिलवाड्यांचीं गोतें:-बूज, माल, बेरड. वस्तिः-त्यांचें रहाण्याचें ठिकाण राजपुताना व उदेपूर होय. गुन्ह्यांचे क्षेत्र:- खैरवाडे दहा दहांच्या टोळ्या करून सर्व इलाखा - भर फिरतात. दिवाळीनंतर ते रेल्वेनें प्रवासाला निघतात, आणि पाव- साळ्यापूर्वी परततात. मजुरीसाठीं ह्मणून ते व्यापाराच्या मोठ्या शह- _रांत वस्ति करतात, आणि आपल्या रोजगाराच्या गांवापासून दहा पंधरा मैलांच्या आंत गुन्हा करतात. भिलवाडे बहुधा गुजराथेंत गुन्ह्या- साठीं उतरतात. गुजराथच्या सरहद्दीवरच्या संस्थानांच्या भिल्लांशीं त्यांचा लागाबांधा असतो. स्वरूप :- खैरवाडे उंच, पिळदार आणि काळे असतात. त्यांच्या मन- गटावर डागल्याचे वण असतात. मारवाड्यांप्रमाणें ते माथ्याची हजा- मत करतात, " गिरदा ” पद्धतीनें केंस राखतात, व मारवाडी रजपुता- प्रमाणें दाढी वाढवितात. ते मारवाड्याप्रमाणें पांढरी किंवा तांबडी पगडी बांधतात. खादी, धोतर, बंडी आणि मारवाडी जोडे हा त्यांचा: