पान:गुन्हेगार जाती.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ गुन्हेगार जाती. त्यांचा एखादा इसम जखमी किंवा ठार झाला तर, ते हरप्रयत्नानें त्याला नेतात, आणि पुढें मागें त्याबद्दल सूड उगवितात. उन्हाळ्यांत घराबाहेर निजलेल्या बायकांच्या अंगावरचे दागिने काढण्यांत मिने फार पटा- ईत आहेत. ज्योतिषी, ( डकोट ) परीट, व भंगी यांची घरें, तसेंच देवळें, मशिदी ते फोडीत नाहींत. परंतु टोळीचा बरेच ठिकाणीं लाग लागला नाहीं तर उठें निघण्यासाठीं ते भंग्याचें घर फोडतात, पण आंत जात नाहींत. एखाद्या घरीं कांहीं मिळालें नाहीं तर, मिने त्या घरांत शौचाला बसून चालते होतात. पुष्कळ लूट मिळण्याचा संभव असला तरच मिने रस्त्यावर दरोडा घालतात. त्यांची दरोडा मारण्याची रीत सानसी लोकांप्रमाणें आहे. अटकेंतल्या मिन्यांवर खबरदारीनें पहारा केला पाहिजे. कारण ते पळून जातात, किंवा पहारेकऱ्यांवर हल्ला करतात. गुन्ह्याची हत्यारेंः-मिन्यांच्या टोळ्यांजवळ दांड्यावेगळी कुन्हाड, काठ्या, चाकू व गणेशखिळा असतो. राजपुताना माळव्यांत त्यांच्या- जवळ तलवारी, बंदुकाही असतात. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल विकून त्याचे पैसे येता ते ते वांटून घेतात. त्यांतून एक हिस्सा धर्मासाठीं, आणि दुसरा साथीदारां- च्या विधवांसाठीं, आणि न्हावीचांभारांसाठीं काढून ठेवितात. मिन्यांच्या जमादाराला कांहीं अधिक हिस्सा मिळत नाहीं. वाट चालतांना चोरीचा माल व वहिमी जिनसा एकजण आपल्याबरोबर घेतो. त्या- च्यामागें व पुढे दोन तीनशें यार्डीवर दोन तीन इसम चालतात. कांहीं दगा फटका दिसल्यास कापड फडफडून, किंवा शब्द बोलून ते इशारा. . देनात. मग मालासह तो इसम आडरस्त्यानें चालता होतो व परसा- कडेचें निमित्त करून माल जमिनींत पुरतो. तळापासून थोड्या अंतरा - • वर ते चोरीचा माल जमिनींत पुरतात, आणि पुढें तो शहरांत नेऊन 'ओळखीच्या वाणी, मारवाडी किंवा सराफास विकतात. मौल्यवान