पान:गुन्हेगार जाती.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजळे मिने. १३७ घराच्या भिंतीला " बगली ” किंवा “ रुमाली ” पद्धतीनें धारें पाडून ते घरांत शिरतात, किंवा माळ्याला धारें पाडून धोतरानें किंवा दोरीनें एक माणूस आंत जातो, आणि तो दार उघडतो. तसेंच मिने दुभा- ळक्या हत्यारांनीं दाराच्या भेगेवाटें खिडक्यांच्या कड्या काढून घरांत येतात. मोठी पेटी नेणें झाल्यास, मोठें चौकोनी धावें पाडतात. या लोकांनी पाडलेलें धावें फारच साफसूफ, नीटनेटकें व दोरीसूद असतें. आवाज होऊ नये म्हणून ते तिजोऱ्या गोदडीवरून दारापर्यंत किंवा धाव्यापर्यंत ढकलीत नेतात. ते खंबीर तारेनें कुलुपें काढतात. बौऱ्यानें पाडलेल्या धाव्यांतून फार झालें. तर माणूस पोटानें सरपटत जाईल. पण मिन्यांच्या धाव्यांत माणसाला बसतां येतें, इतकें तें मोठें असतें. धाव्यांतून शिरण्यापूर्वी काठीला कापड गुंडाळून आंत कोणी आहे क नाहीं, हें पाहून एक इसम आंत शिरतो. आंत गेल्याबरोबर अगकाडी उजळून कोठें काय आहे, हें पाहून ठेवितो. मोठी पेटी किंवा तिजोरी उचलावयाची असली, किंवा आंत माणसें फार असली तर दुसरे इसम मदतीला आंत जातात. हवा, उजेड, किंवा आवाज येऊं नये ह्मणून ते धा- व्याच्या आड कापड धरतात. टोळींतील कांहीं इसम घराच्या वाटा रोखतात. आंतून दिलेला माल घेण्यासाठीं एकजण धाव्याजवळ रहातो. सर्व ठीक चाललें आहे हें टोळीतील इसमांना कळविण्यासाठीं बाहेर एक इसम उंदरा- प्रमाण चिव चिव करीत रहातो. कांहीं दगा दिसून आला तर घुबडांप्रमाणे ते “ घू घू ” करतात. घरांत कोणी जागा झाला तर त्याला ते गप्प बस- वितात, तो ऐकूं नच लागला तर त्याला ठोक देतात, मग त्याचा प्राण गेला तरी बेहेत्तर. रोकड, जवाहीर व जरतारीचें कापड ठेवून घेऊन बाकीचा कपडा गांवाबाहेर रहाणाऱ्या हलक्या जातीच्या वस्तीत, किंवा भटक- णाऱ्या जातीच्या तळावर, किंवा एखाद्या कुपाटीला परत जातांना ते टाकून देतात; असा कीं, जाणारे येणाऱ्याच्या दृष्टीस तो पडावा. गुन्हा करतांना ते एकमेकांशीं आपल्या भाषेत बोलतात. गुन्ह्याच्या प्रसंगी