पान:गुन्हेगार जाती.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ गुन्हेगार जाती. त्यांचे मुलुखांतून बोलावून घेऊन त्यांची बरदास्त ठेवितात. जेथें गांवचे घरभेयांची व मिन्यांची दोस्ती नसते, त्या गांवांत ते फार दिवस ठरत नाहींत. तेथें एखाद्या सावकाराच्या किंवा श्रीमंत मारवाड्याच्या घरा- शेजारीं ते शेवभजीं किंवा बिड्यातंबाखूचें दुकान घालतात, आणि घर हेरल्यावर संधि सांपडतांच तेथें घरफोडी करतात. शुद्ध पक्षांत ते घरें टेहळण्याचें व बेतबात करण्याचें काम करतात, आणि कृष्ण पक्षांत गुन्हे करतात. गांवांत आले म्हणजे एक दोन घाटाच्या किंवा पाणी भरण्याच्या विहिरीच्या आसपास इकडे तिकडे फिरत राहतात, आणि पैकेवाल्यांच्या बायका दिसल्या म्हणजे त्यांच्यामागें जाऊन त्यांची घरें टेहळून ठेवि- तात. दोघे तिघे मिळून भिक्षेला निघतात, आणि भीक मागतां मागतां कोणतें घर पैकेवाल्याचें दिसतें, तें फोडण्याला काय अडचणी आहेत, वगैरेचा तलास व विचार करून ठेवितात. याप्रमाणें दर मुक्कामाच्या गांवीं करीत करीत टोळी पन्नाससाठ मैल शुद्ध पक्षांत चालून जाते; आणि निरनिराळीं गांवें मिळून दहा पंधरा घरें हेरून ठेविते. कृष्णपक्ष लागला ह्मणजे ती परत मार्गे वळते, आणि अखेर शोधून ठेविले असेल त्या घरापासून घरफोडी करण्याला सुरुवात करते. गुन्हा करण्याला निघण्यापूर्वी ते हात मोकळे ठेवून अंगावरून खादीची पासोडी बांधतात, तिला " भजंगी ” किंवा “ गाटी " ह्मणतात. तिच्यांत ते आपले जोडे कमरेला बांधून ठेवितात. धोंडे, सुऱ्या, झाडाच्या नुकत्याच काढलेल्या काठ्या, कुऱ्हाड, आणि बत्ता वगैरे ते बरोबर घेतात. कडची किंवा पळीही कांहींच्याजवळ असते. पण बहुधा त्यांचेजवळ गाडीचा दाब - खिळा, अगर मोटेच्या खालच्या चाकाची आरी किंवा गुळमेख असते; यांना ते " गणेशखिळा " म्हणतात. त्याचीं वरचीं बोंडें कापसांत गुंडाळतात, आणि खालचीं टोंकें दगडावर पाजळतात. कधीं कधीं गुप्तीवजा आंत खिळा असलेली, व बाहेरून लोखंडी विड्या बसविलेली लाठीही त्यांच्याजवळ असते. गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारें दोन मैलांवर फाजील कपडे वगैरे सामान काढून त्याचें गांठोर्डे एखाद्या झाडावर ठेवितात.