पान:गुन्हेगार जाती.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजळे मिने. " १३५ आपण ठाकूर असून पलटणींतल्या आप्ताला भेटण्याला अमुक शहरीं चाललों, असेंही ते सांगतात. अशा वेळीं ते दाढी काढीत नाहींत, व वेषही पालटीत नाहींत. कधीं कधीं ते आपणांला “डकोट " (ज्योतिषी) ह्मणवितात. तेव्हां त्यांच्या खांद्यावर “ खुर्जी ” ( लहान पडशी ), व कधीं कधीं डावे हातांत शनीची मूर्ति, व उजव्या हातांत हुक्का असतो. . कधीं कधीं खांद्यावर कुऱ्हाड टाकून लांकूड फोडण्याचें सोंग करून ते गांवांत हिंडतात, पण कांहीं केल्या लांकडें ह्मणून फोडीत नाहींत. खालीं लिहिलेल्या खुणेवरून मिने ओळखावेत :- ( १ ) ते मारवाड्याप्रमाणें चढाऊ जोडा घालतात व त्याचा शेंडा कापतात. (२) ते शुद्धपक्षांत हजामत करतात, आणि चांगली लूट मिळाल्याशिवाय हजामत करीत नाहींत. ( ३ ) परमुलुखांत ते तांदूळ, ऊंस, फुटाणे, लाह्या व बकऱ्या- खेरीज इतर कोणतेंही मांस खात नाहींत. ( ४ ) ते लग्नांत जेवावयाला जात नाहींत, पण मारवाड्याच्या दिवसाला जातात. ( ५ ) ते एका ताटांत दोघे तिघेही जेवतात, ब्राह्मण असें जेवत नाहींत. (६) आंघोळीचे वेळीं ते पाय घांशीत नाहींत. ( ७ ) ते आपले कपडे सोबकून पिळतात. ( ८ ) ते रामानंदी ( त्रिकोणासारखा ) किंवा श्रीधारण ( त्रिशुळा- सारखा) तिलक कपाळाला लावितात. ( ९ ) त्यांची पगडी मारवाडी पद्धतीची असते. (१०) बकऱ्याची वाळलेली जीभ किंवा तिचे तुकडे अगर तिच्या हरभऱ्याएवढ्या गोळ्या त्यांच्याजवळ असावयाच्याच. कारण बकऱ्याचे जिभेचें मांस त्यांना शकुन पाहण्यासाठीं लागतें. ते ती ( जीभ ) फडक्यांत गुंडाळून मसाल्यांत, तंबाखूंत किंवा मिठांत ठेवितात. गुन्हे:-ह्यांचा कटाक्ष. घरफोडीवर असतो. तिच्यांतून एखाद्या वेळेला दरोडा निष्पन्न होतो, पण ते जाणूनबुजून दरोडा घालीत नाहींत. खा- ण्याला कांहीं नसले तर एखाद्या वेळेला ते बकरें- मेंढरू चोरतात. गुन्ह्यांची पद्धतिः- मोठ्या शहरांत बहुधा ब्राह्मण, ठाकूर, राथोड, • सराफ, मारवाडी वगैरेंत मिन्यांचे दोस्त असतात. ते त्यांना गुन्ह्यासाठीं