पान:गुन्हेगार जाती.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ रुमाल काजळी, चाई गुन्हेगार जाती. सांकेतिक शब्द. घरफोडीचे हत्यार. गिरो (= टोळी )- जमादार अंधारी रात्र. चा नाईक. मच्छर,कुत्ता, डास पोलीस शिपाई. • आपल्यामागें दुसऱ्या टोळ्यांनीं येऊं नये ह्मणून जमादार उर्दू किंवा हिंदीमध्यें आपलें नांव धर्मशाळेंतील भिंतीवर किंवा देवळावर किंवा मैलाच्या दगडावर दिसेल असें लिहितो. टोळी कोणत्या रस्त्याने गेली हें गुन्ह्याच्या धांदलींत मागें राहिलेल्या इसमांना कळविण्याची त्यांची करीत येणेंप्रमाणें आहे:- मुन्ह्यापूर्वी ज्या संकेतस्थानीं कपडे वगैरे ठेवि- नलेले असतात, तेथें हे मागें राहिलेले लोक जातात. त्यांच्यापूर्वी सामान- .. सुमान घेऊन गेलेले लोक त्या ठिकाणीं जमिनीवर आणि नजीकच्या वाटेवर वेडेंवांकडें सापाचें चित्र काढतात; किंवा ज्या झाडावर कपडे ठेविले असतील त्याचीं पानें तोडून तीं तेथून अगदीं जवळच्या वाटे- पर्यंत पसरतात व या वाटेच्या बाजूला सापाचें चित्रही काढतात. जिकडे सापाची शेप असते, त्या बाजूनें टोळी गेली असें समजावें. वाटा फुट- तात किंवा मिळतात, तेथेंही सापाचें चित्र काढलेलें असतें. उपजीविकेची बाह्य साधनें:- ते आपल्या मुलुखांत जमीन कस- तात, जागलकी करतात, किंवा पलटणींत नौकरी धरतात. गुन्ह्यासाठीं फेरीला निघाले ह्मणजे 'जय बालाजीकी जय, ' असें ललकारून ते भीक - मागतात किंवा तंबाखू, काड्याच्या पेट्या, शेवभजीं विकतात. बहुधा ते पैसे गांठीला लावूनच घर सोडतात. वेषांतर:- ते हजामत वगैरे बरोबर करवून मारवाडी किंवा गौड . चोन्नती ब्राह्मणाच्या वेषानें फिरतात, कधीं कधीं पढविण्यासाठी किंवा प्रश्नोत्तरे देण्यासाठीं टोळीबरोबर ते एखादा खरा ब्राह्मणही घेतात. अलीकडे ते संजोगी साधूंचा वेष घेऊं लागले आहेत. संजोगी साधू ब्राह्मणाप्रमाणें पोषाख करतात, व केव्हां केव्हां भगवा फेटा किंवा पागोटें घालतात.