पान:गुन्हेगार जाती.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजळे मिने. १३३ किंवा देवळांत उतरतात, आणि गुन्हे करतात. शहरांत त्यांचे स्नेही त्यांच्यासाठीं भाड्यानेंही घरें घेतात. ते रेल्वेच्या मोठ्या स्टेशनावर, किंवा गुन्हा करावयाचा त्या गांवच्या स्टेशनावर उतरत नाहींत, मधल्याच स्टेशनाचें तिकिट काढून कांहीं थोडासा रस्ता पायीं पायीं चालतात; आणि पुन्हां किरकोळ स्टेशना- वर बसून, एखाद्या मधल्या स्टेशनचें तिकिट काढतात. याप्रमाणें एकेका 'फेरीला ते तीन तीन चार चार वेळां तिकिटें काढतात. गेल्या वाटेनें ते कधीं परतत नाहींत, आणि जेथें गुन्हे करतात त्याचे आसपास दुसऱ्या टोळ्यांना गुन्हे न करण्याविषयीं सांगतात. मिन्यांसंबंधानें ध्यानांत ठेवण्याजोगी गोष्ट ही आहे कीं, जिकडे एक टोळी गेली तिकडे त्यांची दुसरी टोळी जात नाहीं, जी ती टोळी स्वतंत्रपणें गुन्हे करते. मुंबई शहर, महाराष्ट्र, गुजराथ, काठेवाड, कर्नाटक, पंढरपूर वगैरे ठिकाणीं ते गुन्हे करतात. ते एक दोन दिवसांपेक्षां जास्त एकाच गांवांत रहात नाहींत, आणि वाट चालतां चालतां गुन्हे करतात. व स्वरूपः - मिने सुदृढ, बांधेसूद, देखणे आणि मध्यम ते पुऱ्या उंचीचे असतात. त्यांची रहाणी व पोषाख स्वच्छ असून ते रोज स्नान करतात. ते मांसाहारी, दारूबाज व अफूबाज असतात. पण ते गोमांस खात नाहींत. ते परमुलुखांत दाढी काढून टाकतात. ते गोंधीत नाहींत, लहान कानबाळीशिवाय कोणताही दागिना घालीत नाहींत; आणि बहुतेक रजपुतासारखे दिसतात. ते श्रमसहिष्णु व पायशूर असतात, आणि वेळेवर दिवसांतून साठ मैल चालून जातात. गुन्हे करण्याच्या काम ते धीट व युक्तिबाज असतात. भाषाः-जन्मभूमीपरत्वें ते मारवाडी किंवा रजपुतानी भाषा बोलतात. हिंदी आणि उर्दू न अटकतां बोलतात. त्यांच्यांत पुष्कळ शिकले- -सवरलेले असतात. 1