पान:गुन्हेगार जाती.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० गुन्हेगार जाती. याप्रमाणें रुपये तयार झाल्यावर ज्यांना ते चालवावयाचे असतात, ते एकटे किंवा जोडीनें टोळींतून बाहेर पडतात. त्यांच्या धोतराच्या नि- ऱ्यांना चोरखिसे असतात. त्यांत ते खोटी नाणीं ठेवितात. ते खोटे रुपये व अधेल्या, पावल्या, वगैरे एकत्र नेत नाहींत. दांतणाएवढी एक काडी व खोटा रुपया त्यांच्या उजव्या हातांत असतो, त्यामुळे सहज मूठ वळ- लेली राहते. नंतर खेडवळाचें किंवा यात्रेकरूचें सोंग घेऊन बौरी एखाद्या बाईला, किंवा क्वचित् पुरुषाला गांठतो; आणि राजशाही किंवा हाली रुपया येथें चालतो कां, तुह्मी तो मोडतां कां, असें विचारितो. राजशाही नाणें 'चालत नाहीं असें उत्तर मिळालें म्हणजे तो ह्मणतो, कोणता रुपया चालतो तो मला दाखवा. त्याचे डावे हातांत राजशाही रुपया असतो, तो देऊन आपल्या सावजाजवळून तो खरा रुपया घेतो. नंतर तो पाहून त्याबद्दल बोलाचाली करीत असतांना शिताफीनें चटकन् तो उजव्या हातांत घेऊन त्यांतला खोटा रुपया डावे हातांत घेतो. हें चाललें असतां तो आपल्या सावजाच्या तोंडाकडे एकसारखी टक लावितो, व त्याचें लक्ष वेधण्या- साठीं नजरबंदाप्रमाणें एकसारखी पुटपुट लावितो; आणि शेवटीं खोटा रुपया त्याचे हातांत टाकितो. ह्याप्रमाणे एका वेळेला बौरी साधल्यास वीस नाणी चालवितात. परंतु ते एका वेळेला बहुधा दोन आणि एका दिवसांत दहा ते वीस नाणीं चालवितात. त्यांची दुसरी युक्ति अशी आहे कीं, आणा दोन आण्याचें सामान घेऊन खोटा रुपया देऊन बाकीची मोड घ्यावयाची; किंवा राजशाही अगर बादशाही रुपया दुकानदारास याव- याचा; त्यानें तो नाकारला, ह्मणजे खरा रुपया त्याजवळून पहाण्यासाठीं मागून घेऊन त्याच्या बदलीं चलाखीनें खोटा रुपया यावयाचा. अगर दुकानदाराला खरा रुपया द्यावयाचा, आणि घेतलेल्या मालाविषयीं त्या- च्याशीं घासाघीस घालून त्याजवळून तो परत घ्यावयाचा. असें हो ना करीत शेवटीं माल पुन्हां परत घेऊन अखेर दुकानदाराच्या माथीं खोटा रुपया मारावयाचा. तूप वगैरे घेऊन वजन कळत नाहीं, असें दुकानदाराल सांगून त्याला लोखंडी पावशेरास वीस रुपयेप्रमाणें रुपये तागडींत घाला- ते