पान:गुन्हेगार जाती.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मारवाड किंवा गुजराथ बौरी. १२९ चुकांचीं डोकीं वर आलेलीं असतात. खालच्या भागावर तंतोतंत बसल असा दुसरा भाग तयार करून, खालच्या भागांतील चुकांची डोका बस- तील अशीं भोंकें त्यामध्यें ठेवितात. नंतर सांच्याचीं दोन्हीं शकलें साव- लींत वाळवितात, व त्याच वेळीं हातानें घांसून दोन्ही भाग साफ करि- तात. तीं कडक वाळल्यावर आंतील तोंडें दगडानें दोरीसूद घांसून एक- मेकांशी जुळती करतात. नंतर तीनअष्टमांश इंच खोल व रुपयापेक्षां अंमळ मोठा असा एक खळगा खालच्या सकलांत कोरतात, व त्यांतून एक लहान पन्हाळी काढतात. खालच्या सकलांतील खळगा व पन्हाळी ह्यांशीं मिळतें असें गोल भोंक व पन्हाळी वरच्या सकलांत पाडतात. पुढें चुनखडीच्या ( त्यांच्या भाषेंत, मरदका पथर ) वस्त्रगाळ पुडींत थोडें सें तूप घालून लुकण बनवितात. तें खालच्या सकलांतील खळग्यांत व वर- च्या सकलाच्या भोंकांच्या तोंडाशीं बसवितात. त्याचा चिकटा मोडला नाहीं, तर त्यावर जरा राख उधळतात. स्पष्ट ठसा असलेला रुपया खाल- च्या खळग्यांत अर्धा बुडेल असा युक्तीनें दाबून बसवितात. त्या रुपयाच्या उलट बाजूचा ठसा उमटेल अशा रीतीनें वरचें सकल खालच्यावर ठेवून लुकणावर भार घालतात. नंतर शिताफीनें रुपया काढून घेऊन धातूंचा रस ओतण्यासाठीं त्या लुकणांत तजविजीनें एक पन्हाळी काढतात. ह्या- प्रमाणें सांचा झाल्यावर कासें, कथील ( रांगा ) व तांबें समभाग घेऊन वेळणीत आटतात. त्याला “ वग्गर्ल " म्हणतात. त्यांत आणखी नऊ भाग कथील घालून " मावा 'तयार करितात. पळीवर चिखल सारवून तिच्यांत मावा आटतात, आणि रस ठशांत ओततात. सांच्यांतून बना वट रुपया काढला ह्मणजे त्याच्या कडा सुरीनें नीट करितात; आणि त्या चांगल्या उमटाव्यात ह्मणून खऱ्या रुपयाच्या कडांवर त्या दाबतात. नंतर शेण, काजळी, तुरटी, सोरा किंवा हळद ह्यांनी बनावट रुपया घांसतात. ह्मणजे तो उजळ होतो, किंवा तो वापरल्यासारखा दिसतो. एका सांच्यांतून पुष्कळ नाणी पाडतां येतात, पण मधील लुकण वीस वेळ वापरल्यावर बदलावें लागतें. ९ (6