पान:गुन्हेगार जाती.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मारवाड किंवा गुजराथ 'बौरी. १३१ वयाला बौरी लोक लावितात, आणि वेळ पाहून त्या रुपयांच्या बदलीं खोटे रुपये घुसडतात. खोट्या मोहोरांची ठकबाजी करण्याची त्यांची रीत खालीं लिहिल्या- प्रमाणें आहे:- एक मोहोर मावेल अशा दोन अगदी सारख्या पिशव्या तयार करतात. एकींत सुमारें चोवीस रुपये किंमतीची खरी मोहोर घालतात, आणि दुसरींत खोटी मोहोर घालतात. खरी मोहोर पिशवीसुद्धां शेंकडा वीस टक्के व्याजावर वीस रुपयांस गहाण ठेवितात. कांहीं दिवसांनीं गहाण ठेवणारा येतो, आणि व्याज जबर आहे, म्हणून ती मोहोरेची पिशवी परत मागून घेतो. नंतर त्याची व त्याच्या सोबत्यांची नाटकी बोलाचाली होऊन ते मोहोर गहाण ठेवण्याविषयीं त्याचें मन वळवितात, आणि अशा रीतीनें खोट्या मोहोरेची पिशवी वाण्याचे पदरांत टाकितात. गुन्ह्यांचीं उपकरणेंः-सांचा, लोखंडी पळी, खुर्दा, कासें, कथील, सुरी, चुनखडी, माती, वेळणी आणि राजशाही किंवा हालीशिक्का रुपये हीं त्यांचीं उपकरणें होत. धातूच्या रसाची धार इकडे तिकडे सांडूं नये, झणून पळीच्या कांठाला थोडी धार पाडलेली असते. गुन्ह्याचे मालाची व्यवस्थाः - तळापासून वीस पंचवीस पावलांवर अगर अंथरुणाखालीं किंवा चुलीखालीं जमिनींत ते खोटी नाणीं व सांचे पुरतात. त्यांच्या धोतरांच्या पुढच्या निऱ्यांच्या चोरविशांत खोटे रुपये असतात. आणि कासोट्याच्या निऱ्यांच्या चोरखिशांत खरे रुपये येतील तसे ते ठेवितात. त्यांच्या कासोट्याचा कल उजवीकडे असतो. प्रवास करतांना खोटी नाणी पाडण्याचें सामान मुलांच्या खिशांत किंवा बायकांच्या घागऱ्यांच्या चोरखिशांत असतें. खोटी नाणी चालविणारे टोळी सोडून वेगवेगळे जातात.