पान:गुन्हेगार जाती.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ गुन्हेगार जाती. टोळी कोणत्या रस्यानें गेली, हें मागून येणाऱ्या साथीदारांना कळावें ह्मणून तिच्यांतली एखादी बाई वाटेवर मातींत काठीनें नागमोडी आकृती काढते. तसेंच रस्त्यानें ठिकठिकाणीं दगडाखालीं ते पाला ठेवतात, आणि तळाच्या आजूबाजूलाही असल्या खुणा करतात. उपजीविकेची बाह्य साधनें :- मारवाडांत हे लोक जमीन कसतात. इतर ठिकाणीं ते एक सालीं पट्ट्यानें जमिनी करितात. गुजराथेंत काकड्या वगैरे शाक लावतात. पण त्यांचा मुख्य धंदा भीक माग- ण्याचा आहे. कांहीं जण भागीरथीच्या कावडी आणून गंगोदक विकतात, कांहींजण गोपीचंदन कालवून गढूळ केलेलें पाणी गंगोदक ह्मणून विकतात. ते आपणाला गंगाजल वाघरी, किंवा बौरी म्हणवितात. वेषांतरः- ते भाटांच्या किंवा कबीरपंथ्यांच्या वेषानें फेरीला निघ- तात आणि बाण्या, दोहरे न अडखळतां ह्मणतात. खोटी नाणीं चाल- विण्यासाठीं ते एकटे किंवा जोडीनें गिरी गोसाव्यांच्या भगव्या वेषानें रुद्राक्षांच्या माळा घालून तळांतून बाहेर पडतात. ते आपल्या नांवापुढें गीर किंवा दास लावतात. ते गुजराथेंत सलात (पाथरट ) ह्मणून मोड- तात. शिवाय ते ब्राह्मण, कुणबी, कुंभार, रजपूत किंवा चारण ह्मणू- नही गणले जातात. महाराष्ट्रांत ते आपल्याला माळी किंवा फूलमाळी झणवून गांवांत बिऱ्हाड देतात. ते आपलीं नांवें वारंवार बदलतात. गुन्हे :- या जातीचा आनुवंशिक धंदा बनावट नाणी करण्याचा होय. त्यांत पुरुष व स्त्रिया दोन्ही तरबेज असतात. ते रुपये, अधेल्या, पावल्या, चवल्या पाडतात. गुन्ह्यांची पद्धतिः- त्यांची खोटी नाणीं छप्परबंदांपेक्षां सुबक असतात. कुंभाराच्या मातींत थोडासा कापूस किंवा लोंकर घातली म्हणजे तिला चिकणाई येते. सांच्यासाठी असल्या मातीचे पाऊण इच उंचीचे व तीन इंच चौरस असे दोन गोळे करतात. सांच्याच्या खालच्या भागांत समोरासमोरच्या कोनांत दोन लहान चुका ठोकतात. त्या