पान:गुन्हेगार जाती.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मारवाड किंवा गुजराथ बौरी. १२५. होता. ते आपल्या मुलखींचा पत्रव्यवहार बहुधा एखाद्या स्थानिक मित्रामाफत करतात; परंतु त्याला आपल्या जातीचा व धंद्याचा पत्ता लागू देत नाहींत. त्यांच्या पत्रांत मंदर म्हणजे घर, आटा म्हणजे चोरीचा माल, शेर म्हणजे शंभर, हे सांकेतिक शब्द असतात. माल पुरून ठेवण्यासाठीं बौरी जें छिद्र पाडतात, तें तोंडाशीं चिंचोळें व बुडाशीं रुंद असतें. आपल्या तळापाशीं एका बाजूला धावें पाडून त्याच्यांत ते माल ठेवितात. ते सु गोदडींत शिवतात, आणि त्या झटकतांना, सुऱ्या शिवलेल्या असतात त्या ठिकाणीं गोदड्या धरतात; म्हणजे झाड्यांत त्या सांप- डत नाहींत. मारवाड किंवा गुजराथ बौरी. संज्ञाः - मारवाड वाघरी किंवा बौरी यांना गुजराथ बौरी म्हणण्या- चा प्रघात आहे, पण तो चुकीचा आहे. परमार, सोलंकी, शोंकला किंवा वाघेला, दमदारा, दाभी, गेलडा किंवा गेलोट, चोंहाण (सोहाण), अधानी, राठोड, ढेंगानी, अटानी, सांगानी, डेवडा, वगैरे बौयांच्या कुळ्या आहेत. वस्तिः- त्यांचें मूळ ठिकाण मारवाड होय, परंतु त्यांचे कांहीं गुजराथेंत येऊन राहिले आहेत. काठेवाड, सिंध, राजपुताना ह्यांत कांहीं बौरी सांपडतात, थोडेसे मध्यप्रांतांतही आहेत. गुन्ह्यांचे क्षेत्रः- बायकापोरें व तट्टे घेऊन ते मद्रास, बंगाल, मध्य- प्रांत, व-हाड, पंजाबापर्यंत वर्षभर हिंडतात; त्यांच्या टोळींत अज- मासें दहा इसम असतात. पावसाळ्यांत जेथें ओळख पडली असेल