पान:गुन्हेगार जाती.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ गुन्हेगार जाती. अशा ठिकाणीं ते मुक्काम करतात. सडे पुरुष नांवें बदलून आगगाडीनेंही प्रवास करतात. लोकसंख्या:- ह्यांची गणति २००० आहे, पण हा आंकडा संशयास्पद आहे. , स्वरूपः- ते काळे, मध्यम बांध्याचे, श्रमसहिष्णु असून गलिच्छ राहतात. ते दिवसांतून तीस चाळीस मैल चालून जातात. पुरुषांच्या व बायकांच्या पोटावर डागल्याचे वण असतात. धोतर, बंडी किंवा आंग- रखा, मारवाड्या किंवा गुजराथ्याप्रमाणे बांधलेले जुनें पागोटें, किंवा दुपेटा, हा पुरुषांचा पोषाख होय. बायका घागरा ( तो काळा किंवा सफेत कधीं नसतो. ) किंवा लुगडें, काचोळी व ओढणी नेसतात. त्या हातांत नारळीच्या करवंटीच्या बांगड्या, कानांत तोटी, नाकांत लवंग, पायांत रुप्याचे किंवा काशाचे पैंजण आणि जोडवीं घालतात. दोन्ही डाळ्यांजवळ व कानसुलांकडे एक रेघ, डाव्या डोळ्याजवळ नाकपुडी- च्या बाजूला एक ठिपका, डावा गाल आणि हनुवटी यांवर एक ठिपका, याप्रमाणें त्या गोंधतात. शिवाय हात, ऊर आणि पोटऱ्या यांवरही त्या गोंधतात. ही जात दारूबाज असून गाय, डुक्कर सोडून सर्व प्रकारचें मांस खाते. फेरीला निघण्यापूर्वी ते देवदेवक करतात. गांवाबाहेर झाडींत, शेतांत, किंवा मैदानांवर ते पालें ठोकतात. पावसा- ळ्यांत धर्मशाळेत किंवा देवळांत ते बिऱ्हाड देतात, अगर गांवकुसा- जवळ भाड्याने घर घेतात. तांड्याच्या नायकाला जमादार, मालक, पंचसाती, किंवा झाग म्हणतात. भाषा :- बौरी भाषेचें मारवाडीशी साम्य आहे. गुजराथेंत रहाणारे अशुद्ध गुजराथी बोलतात. त्यांना हिंदुस्थानी येतें, व जेथें जातात, तेथलीही भाषा ते उचलतात.