पान:गुन्हेगार जाती.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ करतात. गुन्हेगार जाती. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीच्या मालाचे ते पांच वांटे एक वांटा नाईक उचलतो; आणि बाकीच्या चार वांट्यांचे नाईक व गैरहजर इसम धरून टोळींत जितके लोक असतील, तितके वांटे करतात. नायकाला या मानानें शेंकडा २० प्रमाणें अधिक ऐवज मिळतो. त्यांतून त्यानें खर्च कराव- याचा तो ( १ ) ब्राह्मणदक्षणा. (२) आप्तांपैकीं अनाश्रित स्त्रियांस मदत. ( ३ ) टोळीतील पुरुषांना जेवण देऊन देवताराधना. ( ४ ) डोमांचा हक्क. ( ऐवज मिळाल्याची बातमी लागतांच हे लोक भाटां- च्या वेषानें प्रवास करून टोळीला गांठतात, आणि आपला हक्क उकळ- तात. ) लुटीचे हिस्से पाडतांना पुष्कळ भांडणें तंडणे होतात. असें झालें म्हणजे मालाचे तुकडे करून ज्याचा त्याला हिस्सा देतात. जो तो आपल्या वांट्याचें सोनें, रुपें, जसेंच्या तसें किंवा तेथल्या तेथें बनवि- लेल्या कापसामातीच्या मुशींत गाळून विकून टाकतो. सराफ, सोनार, वाणी, गुजर, बोहारी वगैरे या लोकांकडून चोरीचा माल विकत घेतात. टोळीचा समाईक माल नाईक आपले जवळ ठेवितो, आणि कुच करतांना तो एखाद्या धडधाकट पायशूर इसमाजवळ देतो. मोत्यांच्या किंवा जवाहिरांच्या जिनसा नाईक आपलेपाशीं ठेवून सोयी- प्रमाणें विकतो, आणि आलेल्या पैशाचे हिस्से ज्याचे त्याला देऊन टाकतो. विक्री किंवा वांटणी होईपर्यंत ते तळाजवळ चोरीचा माल पुरून ठेवितात. कुच करतांना प्रत्येक जण आपापल्या हिश्शाचा माल आपले अंगावर नेतो, आणि तळाचे जागीं पुरून ठेवितो; पण पुरलेल्या जागेपासून तळा- पर्यंत उमटलेल्या पावलांवर कापडाचा कांठ फिरवून माग बुजवून टाक- ण्याची जो तो खबरदारी घेतो. कांहीं धोका दिसल्यास मागील तळावर माल ठेवून तेथें साधूचे वेषानें एकजण रहातो, आणि संधि पाहून तो ते तेथून नेतात. बनावट नांवावर मनिआर्डररीने ते रोकड पाठवितात, आणि नक्त माल टोळीतील एक दोन इसमांबरोबर घरीं पाठवितात. एका दिल्लीवाल्यांच्या टोळीतील बाईनें चपात्यांत चोरीचा माल लपवून ठेविला