________________
बौरी किंवा बौरिये. १२३ चेला बनला. त्यानें त्याची इतकी मनधरणी केली कीं, त्याच्यामागें तो त्याचा वारस म्हणून मठाधिपति झाला. विजापूरचे लोकांचा त्यावर भाव बसला, तो इतका कीं, त्याला कोठेही मज्जाव नव्हता. लोकांत व सरकारांत त्याचें वजन बसलें. मठासंबंधी एक काम त्यानें खुद्द कले- क्टरसाहेबांकडुन करवून घेतलें. मठांत पक्की तळघरे असून, भोंवतीं मोठा बगीचाही होता. त्यामुळे आपले जातभाई जमवून त्यांजकडून गुन्हे करविण्याला त्याला चांगली सोय झाली. सन १८८७ सालीं त्यानें ३८ लोकांच्या टोळीकडून विजापूर जिल्ह्यांत पुष्कळ घरफोड्या करविल्या. तेव्हां शिवंगी, हरनाळ, व ताजबावडी मठ, यांजवर पाळत ठेवून व कांहीं गोसावी हाताशी धरून थेट भोपाळपर्यंत पोलीसनें पाठलाग करून त्यांच्या गुन्ह्यांचा पत्ता लावला. असतां पुष्कळ विस्तार होईल. गुन्ह्यांची हत्यारें:- ग्यान ( ती सर्व हकीकत येथें दिली परक्यांच्या देखत ग्यानदास म्हणतात म्हणजे त्यांना वाटावें कीं, त्या नांवाचा कोणी माणूस आहे.) किंवा दौलतीया, सुरी, वस्तरा, काठ्या, मेणवात, काड्यांची पेटी, हीं बौन्यांची हत्यारें होत. सुरीच्या पात्याला मेणवात गुंडाळून ती नाईक धोतरांत डाव्या बाजूला खोंवतो. ग्यान तीन प्रकारचे असतात. दिल्ली- वाल यांचा ग्यान लोखंडी पळीसारखा पण साधारण पळीपेक्षां जड असतो. तो लोखंड व पोलाद यांचा करतात, आणि त्याच्या दांडीला पाणी देऊन धार लावतात. मालपुरे आणि खैरवाडांचा ग्यान पोलादी बत्त्याप्रमाणे सुमारें पंधरा तें अठरा इंच लांब असतो. त्याच्या एका बाजूला बोंड असून दुसऱ्या बाजूला धार व अणी असते. बदकांचा असें ग्यान लोखंडी व पोलादी असून बत्त्यासारखा असतो. त्याची लांबी सहा ते दहा इंच असून त्याला तेवढीच लांकडाची मूठ असते. म्हणतात कीं, मोध्यांचा दौलतीया सर्पाकृति असतो.