पान:गुन्हेगार जाती.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ गुन्हेगार जाती. वाल आणि मालपुऱ्यांच्या टोळीतले गैरहजर इसम छपविण्याची त्यांची युक्ति पोलिसनें लक्षांत ठेवावी. ते काय करतात कीं, निजलेल्या माणसांसारखे दगड किंवा गांठोडीं मांडून त्यांवर पांघरूण घालतात, आणि कोणी तपास केला तर जागे असलेले दोघे तिघे त्यांच्या त्या पांघरुणांकडे बोट दाखवून सांगतात कीं, बाकीचे निजले आहेत. अटकें- तले बौरी पोलीसशीं दंगामस्ती करून पळून जातात, सबब त्यांजवर विशेष काळजीनें पहारा करावा. (( एखादा भीक मागणारा किंवा भटकणारा गोसावी बैरागी, बौरी असावा. असा संशय आला, तर त्याला कांहींएक न विचारतां त्याच्या मागोमाग हळूच तळापर्यंत जावें. कारण त्याला विचारले तर तो कांहीं थांग लागूं देणार नाहीं. बौऱ्यांच्या तळाला मोठ्या सकाळी वेढा देऊन झाडा घ्यावा, म्हणजे कांहींना कांहीं सबब काढून त्यांतले लोक इकडे तिकडे जाऊन सुरी पुरतांना, किंवा मुद्देमाल कुपाटींत, अगर भिंतीवरून टाकतांना नजरेस पडतील. " भंडारी " बहुधा ग्यान " स्वयंपाकाच्या भांड्यांत ठेवतो. ग्यान कोणालाही ओळखण्यासारखा असला, तर तो पुरून ठेव- तात, किंवा वळकटींत, खोगरांत, लपवितात. ग्यानाला ते इतके जपतात कीं, चिलीम ओढण्यासाठीं थोडा वेळ रस्त्यावर बसले तरी ते तो पुरून ठेवितात. पोलीसनीं ओळखिलें म्हणजे ते खूप कांगावा कर- तात. पळीनें पाडल्यासारखें लहान भोंक भिंतीला दिसलें म्हणजे दिल्ली- वाल, किंवा मालपुरे बौऱ्यांनी घरफोडी केली, असें समजावें. कुच करीत असतांना टोळीचा झाडा घेतल्यास मुद्देमाल सांपडण्याचा संभव असतो. बौऱ्यांच्या एका टोळीजवळ गैरहजर इसमांचे जुने दाखले सांपडले. त्यांच्या जोरावर ते दुसऱ्या टोळ्यांपासून पैसे उकळीत. सन १८८३ चे सुमारास बलदेवदास बिन भूपालसिंग ऊर्फ भोपा नांवाचा मालपुरा बौरी विजापुरास आला, आणि ताजबावडी मठांत उतरला. तेथील इनामदार बुवा दुर्गाप्रसाद होता. बलदेवदास त्याचा