पान:गुन्हेगार जाती.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौरी किंवा बौरिये. १२१ घेतो. मोधिये सुरीऐवजीं वस्तरा घेतात. पिटवाडी आपल्याबरोबर का- क्या घेतात. ते चिरगुटाला मेण लावून त्याची उजेडासाठीं वात करतात. बगली पद्धतीने साधलें नाहीं तर ते रुमाली पद्धतीनें भिंतीला इतकें लहान भोंक पाडतात कीं, त्यांतून फरपटत मात्र जातां येईल. टोळीं- तील एक इसम कापडानें तें भोंक झांकून घेतो. त्यामुळे आंतल्या माण- सांची झोंप हवेच्या गार झुळकेनें किंवा उजेडानें मोडत नाहीं, व बाहे- रच्या माणसांना खोलींतला उजेड दिसत नाहीं. कधीं कधीं खिडक्यांचे गज वांकवून काढून ते त्यांवाटें आंत शिरतात. टोळीचा नाईक एकटाच घरांत शिरतो,वात लावतो आणि लोक कोठें निजले आहेत, पेट्या कोठें आहेत, हें ध्यानांत आणतो. वात विझवून कोणाला किती झोंप लागली आहे, याचा कानोसा प्रत्येकाजवळ ओणवा होऊन तो घेतो. नंतर शिजविलेलें अन्न व धान्य वगळून जें हातीं लागेल, तें तूप, मिठाईसुद्धां उचलून बाहेर पिटवाडी असतात, त्यांच्याजवळ तो देतो. ते पेट्या न फोडतां बाहेर नेतात. निजलेल्या माणसांच्या अंगावरचे दागिने ते शिताफीनें जलद काढतात; कोणी जागें झालें, किंवा अंगावर आलें, तर हाती लागेल तें घेऊन ते पळून जातात. निसटून जाण्यासाठींच मारहाण किंवा दुखापत करतात, एरवीं नाहीं. तर बाहेरचे साथीदार त्याच्या मदतीला येतात. फक्त ते दुसऱ्याला नाईक आंत सांपडला आणि मग ते हवी ती पिटवाड्यांपैकीं जखम करतील, पण आपली सुटका करून घेतील. कांहीं आंत नाईकाला मदत करतात, तर कांहींजण पाळत ठेवतात. पकडलेल्या सशाप्रमाणें त्यांनी शब्द काढला म्हणजे कांहीं दगा आहे, असें समजावें. पिटवाड्यांच्या दृष्टीआड आंतल्या खोलींत जावयाचें अस- ल्यास, नाईक त्यांना तसें कळवितो; कां कीं वेळ पडल्यास त्यांना लोकर मदतीला येतां यावें. शकुन पाहाण्यासाठीं आणि कोणी काय करावें, हें ठरविण्यासाठीं बौरी थोडे ज्वारीगव्हाचे दाणे, व ममरखीच्या बिया चिंध्यांत बांधून बरोबर नेतात. मालपुऱ्यांतला ज्योतिषी किंवा मंत्रतंत्र जाणणारा इसम घर फोडण्याचे आधीं त्यावर पांढरी गुंज फेंकतो. दिल्ली-